पुणे : बार्टी, सारथी, महाज्योती या संस्थांच्या माध्यमातून पीएच. डी. अभ्यासक्रमासाठी दिल्या जाणाऱ्या अधिछात्रवृत्तीसाठीच्या चाळणी परीक्षेत पुन्हा तीव्र आक्षेप घेतला आणि घोषणाबाजी करून आंदोलन केले. पेपरफुटीचा आरोप करत काही केंद्रांवर गोंधळ घालण्यात आला.
राज्य शासनाच्या बार्टी, सारथी, महाज्योती या संस्थांच्या माध्यमातून पीएच. डी. अभ्यासक्रमासाठी दिल्या जाणाऱ्या अधिछात्रवृत्तीसाठी डिसेंबरमध्ये परीक्षा घेण्यात आली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागाकडून घेण्यात आलेल्या या परीक्षेत २०१९ झालेल्या सेट परीक्षेची प्रश्नपत्रिका जशीच्या तशी विद्यार्थ्यांना देण्यात आली. मात्र, त्यावर विद्यार्थ्यांनी आक्षेप घेत परीक्षा रद्द करण्याची मागणी केली. त्यामुळे याबाबत निर्णय घेण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात बैठकी घेऊन फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार बुधवारी परीक्षा आयोजित करण्यात आली.
परीक्षेच्या प्रश्नपत्रिका लाखबंद नसल्याचा आरोप करण्यात आला. त़्यात काही प्रश्नपत्रिकांना ए , बी सील होते, तर सी आणि डी सील नव्हते. प्रश्नपत्रिकेच्या छायाप्रती काढून दिल्याचा आरोप करत परीक्षा केंद्रांवर गोंधळ घालण्यात आला.
हेही वाचा : शिक्षण विभाग वगळता अन्य कामे शिक्षकांना नको; शासन नियुक्त समितीकडून अहवाल सादर
याबाबत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विजय खरे म्हणाले, का पूर्ण काळजी घेऊन परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. प्रश्नपत्रिका फुटण्याचा प्रश्नच येत नाही.