पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पुन्हा हाणामारीची घटना घडली. या घटनेत एका विद्यार्थ्याच्या डोक्याला दुखापत झाली असून, त्याला ओैंध येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या आवारातील एसपीपीयू कौशल्य विकास केंद्रात दोन विद्यार्थी शिकत आहे. त्यांच्यात किरकोळ कारणातून वाद झाला. वादाचे पर्यवसन हाणामारीत झाली.
हेही वाचा >>> तुळजापूरच्या कवड्याच्या माळेसह कोणत्या उत्पादनांना मिळाले जीआय मानांकन? जाणून घ्या सविस्तर…
एका विद्यार्थ्याच्या डोक्यात कठीण वस्तू मारण्यात आल्याने तो जखमी झाला. विद्यार्थ्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, अद्याप याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार देण्यात आली नाही, अशी माहिती चतु:शृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय कुलकर्णी यांनी दिली. गेल्या आठवड्यात समाजमाध्यमातून प्रसारित करण्यात आलेला राजकीय मजकूर हटविण्यास सांगितल्याने झालेल्या वादातून एका विद्यार्थ्याला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली होती. याप्रकरणी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.