राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणातर्फे (एनटीए) घेतल्या जाणाऱ्या केंद्रीय विद्यापीठ प्रवेश परीक्षा-पदवीपूर्व (सीयूईटी-युजी) परीक्षेसाठी गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्येत ४ लाखांनी वाढ झाली आहे. यंदा १३ लाख ९९ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज आणि परीक्षा शुल्क भरले आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष प्रा. एम. जगदेशकुमार यांनी ट्विटच्या माध्यमातून ही माहिती दिली.

हेही वाचा >>> शीतपेयातून गुंगीचे ओैषध देऊन तरुणीवर बलात्कार; खडकी कटक मंडळाच्या उपाध्यक्षांसह दोघांवर तरुणीचा विनयभंग केल्याचा आरोप

Faculty Recruitment Newly Advertised Recruitment for 111 seats in two months
प्राध्यापक भरती नव्याने जाहिरात; १११ जागांवर दोन महिन्यांत भरती?
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Nagpur University, Nagpur University Professor,
फसवणुकीचा आरोपी प्राध्यापक वीस महिन्यांपासून घेतो पूर्ण वेतन, कारवाई शून्य…
Announcement of CP Radhakrishnan Professor Recruitment by Maharashtra Public Service Commission in Universities nashik news
विद्यापीठांमध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे प्राध्यापक भरती,नाशिकमध्ये आदिवासी विद्यापीठ; राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची घोषणा
RG Kar Medical College and Hospital Principal Dr Sandeep Ghosh arrested by CBI on charges of financial irregularities
‘आर. जी. कर’च्या माजी प्राचार्यांना अटक
Mumbai University, Winter Session Exams,
मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्रातील परीक्षा २३ ऑक्टोबरपासून
Nagpur, Music Teacher, nagpur school teacher beating srudent, Student Beating, Complaint, Education Officer, Deputy Chief Minister, School Education Minister,
शिक्षिकेकडून विद्यार्थ्याला बेदम मारहाण, कायदा काय सांगतो?
62nd convocation ceremony of iit bombay students awarded phd and degrees
४९८ विद्यार्थ्यांना पीएचडी, तर ३०१९ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान; आयआयटी मुंबईचा ६२ वा दीक्षांत समारंभ व विभागीय पदवी पुरस्कार सोहळा उत्साहात

विद्यार्थ्यांना पदवीपूर्व आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी वेगवेगळ्या विद्यापीठांच्या प्रवेश परीक्षा द्याव्या लागू नयेत यासाठी युजीसीने गेल्यावर्षी सीयूईटी परीक्षा सुरू केली. गेल्यावर्षी एकूण ९० विद्यापीठांनी सीयूईटीमध्ये सहभाग घेतला होता. त्यातील ४४ केंद्रीय विद्यापीठे होती. यंदाची सीयूईटी २१ मेपासून सुरू होणार आहे. या परीक्षेसाठी नोंदणीची अंतिम मुदत ३० मार्च होती. यंदाच्या परीक्षेत २४२ विद्यापीठे सहभागी झाली आहेत.

प्रा. जगदेशकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार २०२२मध्ये एकूण १२ लाख ५० हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील ९.९ लाख विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज भरला होता. तर यंदाच्या सीयूईटीसाठी नोंदणी केलेल्या १६.८५ लाख विद्यार्थ्यांपैकी १३.९९ लाख विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज आणि शुल्क भरले. त्यामुळे २०२२च्या तुलनेत २०२३मध्ये परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ४ लाखांनी, म्हणजेट ४१ टक्क्यांनी वाढली आहे.