राज्यसेवा मुख्य परीक्षा पॅटर्न २०२५ पासून राबविण्यात यावा, या मागणीसाठी पुण्यातील अलका टॉकीज चौकात स्पर्धा परीक्षा देणार्या विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन सुरू आहे.या आंदोलनात विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. ‘हमारा पच्चीस नही तो तुम्हारा चौबिस नही’, अशा घोषणा पुण्यातील आंदोलनावेळी विद्यार्थ्यांनी केंद्र आणि राज्य सरकार विरोधात घोषणा देत निषेध नोंदविला. काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते अतुल लोंढे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे आंदोलनात सहभागी झाले होते.
हेही वाचा- ‘राज्यसेवा मुख्य परीक्षा पॅटर्न २०२५ पासून राबविण्यात यावा’; पुण्यात विद्यार्थ्यांचे आंदोलन
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यानी आंदोलनकर्त्यांची भेट घ्यावी
स्पर्धा परीक्षा देणार्या विद्यार्थी वर्गाच्या प्रश्नासाठी आजवर अनेक वेळा राज्य सरकार सोबत बैठक घेतली. त्याभेटी दरम्यान प्रश्न सोडविला जाईल असे सांगितले गेले. आजवर राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. हे लक्षात घेण्याची गरज असून या आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून कोणत्याही प्रकाराचा गुन्हा दाखल झाल्यास, सरकारला भविष्यातील परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशारा काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी राज्य सरकारला दिला. तसेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आज पुण्यात कार्यक्रमासाठी येणार आहेत. तर त्यांनी या विद्यार्थ्यांना पाठ दाखवून न जाता,आंदोलनाच्या ठिकाणी दोघांनी भेट देऊन प्रश्न सोडविण्याची मागणी यावेळी त्यांनी केली.
हेही वाचा- पुणे जिल्ह्यातील १३ अनधिकृत शाळांवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश
तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही
राज्यातील अनेक भागात लाखो विद्यार्थी राज्य सेवेची तयारी करीत असतात.त्या विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असताना. २०२३ पासून अभ्यासक्रमात बदल करण्यात येत आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे. त्यामुळे तो नियम २०२५ पासून लागू करावा अशी आमची राज्य सरकार आणि आयोगाकडे मागणी असल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वीही या प्रश्नावर आम्ही आंदोलन केले आहे.आता आम्ही मागे हटणार नसून विद्यार्थ्यांच्या बाजूने निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही अलका टॉकीज चौकात जाणार नाही, असा इशारा राज्य सरकारला काँग्रेस पक्षाचे सहकार प्रदेश सरचिटणीस बळीराम डोळे यांनी दिला.