देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचा उपक्रम म्हणून ‘हर घर ध्यान’ हे अभियान राबवण्यात येणार आहे. त्या अंतर्गत देशभरातील विद्यार्थी आणि प्राध्यापकांना मानसिक स्वास्थ्यासाठी आता आर्ट ऑफ लिव्हिंगकडून ध्यानाचे धडे घ्यावे लागणार आहेत.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने आतापर्यंत ‘हर घर तिरंगा, हर घर आयुर्वेद’ असे विविध उपक्रम राबवण्यात आले आहेत. त्यानंतर आता केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयातर्फे आर्ट ऑफ लिव्हिंग फाऊंडेशनच्या सहकार्याने राबवल्या जाणाऱ्या ‘हर घर ध्यान’ या अभियानाची माहिती विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) परिपत्रकाद्वारे दिली. या अंतर्गत ध्यान आणि मानसिक स्वास्थ्याबाबत तोंडओळख करून देणाऱ्या एक तासाच्या अभ्यासक्रमाची निर्मिती श्री श्री रविशंकर आणि आर्ट ऑफ लिव्हिंगमधील प्रशिक्षकांनी केली आहे.

second phase, teacher recruitment,
शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा कधी? ऑनलाइन कामकाजासाठी प्रशासकीय मान्यता
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Higher education , skill courses, guidelines UGC,
उच्च शिक्षणात आता कौशल्य अभ्यासक्रमांवर भर; ‘यूजीसी’कडून मार्गदर्शक सूचनांचा मसुदा प्रसिद्ध
Higher Education Policy State University Chancellor Elections
उच्च शैक्षणिक धोरणदशा!
yavatmal student success in london school of economics
यवतमाळचा विद्यार्थी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत
Kavikulaguru Kalidas Sanskrit University ,
‘या’ विद्यापीठात मिळणार कर्मकांडाचे प्रशिक्षण! उद्देश वाचून थक्क व्हाल…
assistant professor without NET-SET
सहायक प्राध्यापक होणे नेट-सेटशिवायही शक्य?
UPSC Preparation UPSC Preliminary Exam Paper I GS
यूपीएससीची तयारी : यूपीएससी पूर्वपरीक्षा पेपर I (GS)

हेही वाचा >>> कोकण, पश्चिम महाराष्ट्रात पावसाळी वातावरण; दक्षिण कोकणात पाऊस

या अभ्यासक्रमाची विनामूल्य सत्रे संस्थांमध्ये त्यांच्या क्षमतेनुसार राबवली जाणार असल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी उच्च शिक्षण संस्थांनी प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करावे. tiny.cc/hgd-college या दुव्याद्वारे अर्ज भरावा, संस्थेतील एका वरिष्ठ प्राध्यापक किंवा कर्मचाऱ्याला मेडिटेशन अँबेसिडर म्हणून नियुक्त करावे. आर्ट ऑफ लिव्हिंगकडून सत्राच्या आयोजनाबाबत संपर्क साधण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Story img Loader