पुणे : राज्यसेवा मुख्य परीक्षा पॅटर्न २०२५ पासून राबविण्यात यावा.या मागणीसाठी पुण्यातील शास्त्री रस्त्यावर स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले असून विद्यार्थ्यांकडून जोरदार घोषणा देण्यात येत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आम्ही विद्यार्थी मागील अनेक वर्षांपासून राज्यसेवा परीक्षेची तयारी करीत आहोत.पण अचानक आयोगाकडून आदेश काढला जातो की, २०२३ पासून तुमच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात येत आहे. हा निर्णय आम्हाला मान्य नाही. आयोगाने २०२५ मध्ये तो नियम लागू करावा अशी आमची राज्य सरकारकडे मागणी आहे.

राज्य सरकार अनेक निवडणुका पुढे घेत जात आहे. त्यामुळे आमचा अभ्यासक्रमाचा निर्णय २०२५ पासून लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारला सहज शक्य आहे. त्यामुळे राज्य सरकारने विद्यार्थ्यांचा विचार करून निर्णय घ्यावा ,अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करू असा इशारा देखील विद्यार्थ्यांनी यावेळी दिला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Students started protest shastri street pune demanding implementation of mpsc exam pattern from 2025 onwards svk 88 tmb 01