पुणे : जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यात जिल्हा परिषदेच्या दोन प्राथमिक शाळेत प्रत्येकी एक-एक विद्यार्थी आणि या दोन शाळांसाठी तीन शिक्षक आहेत. एकाच गावातील रहिवासी असलेल्या दोन विद्यार्थ्यांपकी एक विद्यार्थी गावच्या शाळेत, तर दुसरा विद्यार्थी पाच किलोमीटर असलेल्या शाळेत शिक्षण घेत आहे. विशेष म्हणजे, एका विद्यार्थ्यांची स्वत: शिक्षकच शाळेत ने-आण करीत असल्याचे शिक्षणाधिकाऱ्यांच्या भेटीतून उघड झाले असून, या संदर्भात केंद्र प्रमुख आणि विस्तार अधिकाऱ्याकडून खुलासा मागवण्यात आला आहे.  

 एकीकडे जिल्हा परिषद शाळांमध्ये पुरेसे शिक्षक नसल्याची ओरड केली जाते. तर दुसरीकडे कमी पटसंख्येच्या शाळेत अतिरिक्त शिक्षक कार्यरत असल्याचेही प्रकार घडत आहेत. या पार्श्वभूमीवर वेल्हे तालुक्यातील अतिदुर्गम पानशेत खोऱ्यातील आंबेगाव बुद्रुक आणि घिवशी येथील प्राथमिक शाळेत दोन विद्यार्थी आणि तीन शिक्षक असा प्रकार समोर आला आहे. आंबेगाव बुद्रुक येथील प्राथमिक शाळेत एक, तर पाच किलोमीटर अंतरावर घिवशी येथील शाळेत एक विद्यार्थी पटसंख्या आहे. दोन्ही विद्यार्थी एकाच गावचे आहेत. मात्र एक विद्यार्थी त्यां गावातील शाळेत, तर दुसरा घिवशी येथील शाळेत शिकत आहे. आंबेगाव बुद्रक येथे दोन शिक्षक, तर घिवशी येथील शाळेत एक शिक्षक कार्यरत आहे. याच गावातील शिक्षक शेजारच्या गावात दररोज ने-आण करीत असल्याचे शिक्षणाधिकाऱ्यांनी अचानक दिलेल्या भेटीतून स्पष्ट झाले. या पार्श्वभूमीवर संबंधित केंद्रप्रमुख आणि विस्तार अधिकाऱ्यांना नोटिस पाठवून खुलासा मागवण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेकडून देण्यात आली.

TET, AI Technology TET, TET candidates,
टीईटी परीक्षेत एआय तंत्रज्ञान वापरल्याचा परिणाम काय? किती उमेदवारांनी दिली परीक्षा?
15 November Mesh To Meen Horoscope
१५ नोव्हेंबर पंचांग: कार्तिक पौर्णिमेला कोणाला होईल धनप्राप्ती?…
Tula Shikvin Changlach Dhada
भुवनेश्वरी आणि चारुलताच्या गोंधळात अक्षराच वेडी ठरणार; नेटकरी म्हणाले, “शिक्षिका असून सुद्धा…”
PM Vidyalakshmi Scheme
उच्च शिक्षण घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांना मिळणार १० लाखांपर्यंत शैक्षणिक कर्ज; काय आहे ‘पंतप्रधान विद्यालक्ष्मी योजना’?
Demonstrations by artists
कला अकादमी आणि नूतनीकरणाची मोगलाई
Loksatta balmaifal The fun of sharing kid moral story
बालमैफल : शेअरिंगची गंमत
10th student commits suicide before pre-examination
पूर्वपरीक्षेपूर्वी दहावीतील विद्यार्थिनीची आत्महत्या
Canada has ended fast track visas for foreign students
कॅनडात शिक्षणासाठी जाणे कठीण, फास्ट ट्रॅक व्हिसावर घातली बंदी; याचा भारतीय विद्यार्थ्यांवर काय परिणाम होणार?