लोकसत्ता प्रतिनिधी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
पिंपरी : सागरमाथा गिर्यारोहण संस्थेच्या वतीने नववर्षाच्या पूर्वसंध्येला सुळक्यांच्या विश्वातील सर्वांत देखण्या माहुली किल्ल्याजवळच्या वजीर सुळक्यावर यशस्वी चढाई करण्यात आली.
माहुली किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या वांद्रे गावाजवळील नंदिकेश्वराच्या मंदिरात ३० डिसेंबर रोजी सर्व चमू पोहोचला. रविवारी सकाळी लवकरच हा चमू सुळक्याच्या पायथ्याशी पोहोचला. निसर्गदेवतेचे व सुळक्याचे पूजन करून सकाळी १० वाजता चढाईस सुरुवात करण्यात आली. चढाईचे संपूर्ण तांत्रिक नियोजन श्रीहरी तापकीर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाले. सर्वप्रथम शरद पवळेने चढाईस सुरुवात केली, त्या वेळी त्याचा सुरक्षा रोप (बिले) सत्यवान शिरसाट देत होता. अंगावर येणारी ९० अंशातील खडी चढाई करत शरद आणि सत्यवान यांनी सुमारे ८० फुटांपर्यंत दोन स्टेशनपर्यंत सुरक्षित चढाई केली.
आणखी वाचा-‘बार्टी’प्रमाणे परीक्षा रद्द करा; ‘सारथी’कडे उमेदवारांची मागणी
यानंतर अनिल पवळेने सरळसोट कातळ भिंतीचा अवघड टप्पा यशस्वीपणे चढाई करत तिसरे स्थानक गाठले. तेथून पुढे सर्वांत आव्हानात्मक ‘ओव्हर हँग’ची चढाई पुन्हा एकदा शरदने अतिशय कौशल्याने पार करत चौथे स्थानक गाठले. सुळक्याचा माथा केवळ ३० फूट अंतरावर होता. परंतु, तिथे मातीयुक्त खडकातील घसरडा, अतिशय निसरडा चढाई मार्ग होता. शरद, सत्यवान यांनी या टप्प्यात सुरक्षित चढाई करत दुपारी एक वाजता सुळक्याचा माथा गाठला आणि ‘जय भवानी जय शिवाजी’ व ‘हर हर महादेव’ अशा घोषणा दिल्या.
त्यानंतर अनिल पवळे, हृषीकेश देवकर, प्रकाश ढमाले व राजेश जाधव यांनी सुळक्याचा माथा गाठला. या सर्वांनी सुरक्षितपणे चढाई करत असताना पहिल्या दोन स्थानकापर्यंत पृथ्वीराज बोऱ्हाडे व अक्षय हत्ते यांनी चढाई केली. पांडुरंग शिंदे यांनी तांत्रिक साहित्य व बेस कॅम्प नियोजनाची जबाबदारी पार पडली.