संजय जाधव

पुणे : सुरतमधील एका मेंदूमृत व्यक्तीमुळे पुण्यातील महिलेला जीवदान मिळाले आहे. या व्यक्तीची दोन्ही फुफ्फुसे विशेष विमानाने पुण्यात आणून त्यांचे प्रत्यारोपण करण्यात आले. यासाठी ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला होता. त्यामुळे अतिशय वेगाने ही सर्व प्रक्रिया पार पडून संबंधित महिलेचा जीव वाचू शकला.

pets cats
पाळीव प्राण्यांच्या विरहाच्या भीतीने नैराश्य, तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
kama Hospital study shows increased diabetes prevalence in pregnant women due to changing lifestyles
गर्भधारणेच्या वेळी महिलांना मधुमेहाचा धोका
ambulance
गर्भवती महिलेचा थोडक्यात वाचला जीव! रुग्णवाहिकेतील ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट, थरारक Video कॅमेऱ्यात कैद
chatura cesarean delivery
स्त्री आरोग्य: गर्भजल कमी असल्यास ‘सिझेरियन’ अनिवार्य आहे?
Greater Noida
Greater Noida : डोळ्यावर शस्त्रक्रिया न करताच हॉस्पिटलने ४५ हजार उकळले; दुसऱ्या डॉक्टरनी तपासल्यानंतर झालं उघड
Vidhan Sabha election, Pune blood shortage, Pune,
विधानसभा निवडणुकीमुळे पुण्यावर रक्तटंचाईचे सावट! रक्तपेढ्यांमध्ये पाच दिवसांचाच रक्ताचा साठा शिल्लक

पिंपरीतील डीपीयू प्रायव्हेट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये हे प्रत्यारोपण झाले. एक ५३ वर्षीय महिला कबुतरांच्या संपर्कात आल्याने तीव्र फुफ्फुसाच्या आजाराने ग्रस्त होती. तिला २० सप्टेंबरला डीपीयू प्रायव्हेट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. श्वसनास त्रास होत असल्याने व्हेंटिलेटरची आवश्यकता भासू लागली. त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

आणखी वाचा-पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीची मोफत वायफायची घोषणा हवेतच

तिची प्रकृती खालावल्याने तिचे नाव दुहेरी फुफ्फुस प्रत्यारोपणासाठी अवयवप्राप्तीच्या प्रतीक्षा यादीत नोंदविले होते. रुग्णालयाला २८ सप्टेंबरला पुणे विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समितीमार्फत योग्य अवयवदाता उपलब्ध असल्याची माहिती मिळाली. सुरत जिल्हा रुग्णालयामध्ये ४२ वर्षीय मेंदूमृत पुरुषाच्या नातेवाइकांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. सूचना मिळाल्यानंतर, डॉक्टरांचे पथक ताबडतोब सुरतला रवाना झाले. सुरतच्या जिल्हा रुग्णालयामधून २९ सप्टेंबरला दुपारी चारला अवयव काढण्यात आले आणि दोन तास १५ मिनिटांत संध्याकाळी सहा वाजून १५ मिनिटांनी पिंपरीतील डीपीयू प्रायव्हेट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले.

आणखी वाचा-नाच रे मोरा…दुर्गादेवी टेकडीवर मोरांचा मुक्त संचार

सुरतहून पुण्याला विशेष विमानाने ही फुफ्फुसे आणण्यात आली. यासाठी सुरतमधील जिल्हा रुग्णालय ते सुरत विमानतळ आणि नंतर पुणे विमानतळ ते डीपीयू प्रायव्हेट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल या मार्गावर ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला. सुरत आणि पुणे वाहतूक पोलीस विभागाच्या सहकार्याने ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला. त्यामुळे हे अवयव पुण्यात वेळेत पोहोचून त्याच दिवशी फुफ्फुस प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली.

आमचे ध्येय आरोग्य सुविधा सक्षम करणे हे आहे. त्याला अत्याधुनिक पायाभूत सुविधांची जोड असेल. मी सुरत आणि पुण्याच्या वाहतूक पोलिसांचे आभार मानते. ही अवयवदानाची प्रक्रिया सुलभतेने पार पाडणाऱ्या आमच्या कुशल डॉक्टरांचेही अभिनंदन करते. -डॉ. भाग्यश्री पाटील, प्र-कुलपती, डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ (अभिमत विद्यापीठ)