वैयक्तिक आयुष्यात ‘सिकल सेल अ‍ॅनिमिया’ या विकाराचा सामना करत असताना त्यावर उपचारांसाठी संशोधन करून अनेक ‘सिकल सेल अ‍ॅनिमिया’ग्रस्तांना उपयुक्त ठरेल असे संशोधन डॉ. पूजा दोशी यांनी केले आहे. ‘बोन ट्रेसिंग’साठी वापरले जाणारे ‘एलिझरिन’ हे औषध सिकल सेल अ‍ॅनिमियावर उपचार करण्याबाबतचे संशोधन त्यांनी केले असून त्याची दखल अमेरिकेतील जर्नलकडून घेण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डॉ. पूजा दोशी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागात सहायक प्राध्यापक म्हणून काम करतात. बाजारातील उपलब्ध औषधे सिकल सेल अ‍ॅनिमियावरील उपचारांसाठी वापरण्याबाबत गेली सहा वर्षे डॉ. दोशी यांनी संशोधन केले आहे. भारताच्या ग्रामीण भागात लाखो आदिवासींमध्ये     ‘सिकल सेल अ‍ॅनिमिया’ उपचारांसाठी डॉ. पूजा दोशी यांचे संशोधन सिकल सेल अ‍ॅनिमिया हा विकार आढळतो. ‘हायड्रॉक्सी युरिया’ हे औषध महाग असल्याने त्यांना परवडण्यासारखे नाही. त्यामुळे या संशोधनाची ‘क्लिनिकल ट्रायल’ पूर्ण झाल्यानंतर अनेक गरजू रुग्णांना त्याचा लाभ मिळणार आहे.

डॉ. दोशी म्हणाल्या, सिकल सेल अ‍ॅनिमिया हा रक्ताशी संबंधित विकार असून या विकारावर उपचार करण्यासाठी सद्यस्थितीत बाजारात केवळ हायड्रॉक्सी युरिया हे एकमेव औषध उपलब्ध आहे. उपलब्ध असलेल्या इतर औषधांपैकी एखादे औषध किंवा त्यांतील विशिष्ट घटक सिकल सेल अ‍ॅनिमियावरील उपचारांसाठी वापरण्याबाबत संशोधन करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी अनेक औषधे आणि कंपाऊंड्सवर संशोधन केल्यानंतर एलिझरिन हे औषध सिकल सेल अ‍ॅनिमियावर उपयुक्त असल्याच्या निष्कर्षांप्रत आम्ही आलो आहोत. प्राण्यांच्या उतींवर औषधाचा वापर करून त्याचा परिणाम अभ्यासणे शक्य नसल्याने मानवाच्या रक्तातील सिकल हिमोग्लोबिनवर औषधांचा प्रयोग करून आम्ही हे संशोधन केले आहे. त्यासाठी महाराष्ट्र आरोग्य मंडळ आणि पद्मश्री डॉ. सुदाम काटे, सिडॅक तसेच पी. एचडी. आणि एम. फिल.च्या विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. याबरोबरच ‘हर्बल फॉम्र्युलेशन’ घटकांचा वापर सिकल सेल अ‍ॅनिमियावर करण्याबाबत संशोधन सुरू असून पुढील दोन ते तीन महिन्यात ते पूर्ण होणार आहे. ते ‘अमेरिकेतील जर्नल ऑफ बायोमोलेक्यूलर स्ट्रक्चर अ‍ॅण्ड डायनॅमिक्स’मध्ये प्रसिद्ध झाले आहे.