उद्योगांच्या क्षेत्रात महिलांनी उतरणे हे आता फारसे दुर्मिळ राहिले नसले तरी काही उद्योग हे महिलांचे उद्योग आणि काही फक्त पुरुषांचे असे ठरवून घेतल्यासारखे चित्र आजूबाजूला पाहायला मिळते. सुप्रिया जगदाळे ही तरुण उद्योजिका मात्र या नियमाला अपवाद आहे.

वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून सुप्रियाने फॅब्रिकेशन व्यवसायात उडी घेतली आणि धायरी परिसरात समृद्धी उद्योग हा फॅब्रिकेशनचा कारखाना ती यशस्वीपणे सांभाळत आहे. कारखाना यशस्वीपणे चालवण्यासाठी सुप्रियाने फॅब्रिकेशनमधील सगळी कौशल्य  शिकून घेतली. वेल्डिंग, डिझाईनिंग, फिनिशिंग, ग्राइंडिंग अशा सगळ्या गोष्टी तिला करता येतात. शाळांसाठी लागणारी बाके, हॉस्टेलमध्ये वापरले जाणारे बंक बेड, कपाटे, बागेतील खेळणी, फोल्डिंगचा झोपाळा, सी-सॉ अशा अनेक उत्पादनांची निर्मिती त्या करतात. सुप्रियाच्या कामाचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे हे काम युवती आणि महिलांनी शिकावे असेही तिला वाटते आणि युवतींना, महिलांना शिकवण्याची तिची मनापासून तयारी आहे.

Story img Loader