पुणे : पोटनिवडणूक प्रत्यक्षात होईल की नाही, हे सांगता येणार नाही. मात्र निवडणूक आयोगाकडून मतदारांच्या प्रतिनिधी निवडण्याच्या अधिकाराची पायमल्ली करण्यात आली. लोकप्रतिनिधित्व कायद्याच्या कलम १५१ क नुसार विधानसभा, विधान परिषद, लोकसभा किंवा राज्यसभेची जागा रिक्त झाल्यानंतर सहा महिन्यांत पोटनिवडणूक घेणे आयोगाचे कर्तव्य आहे. आयोगाने त्यांची जबाबदारी पार न पाडल्यानेच मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याची प्रतिक्रिया याचिकाकर्ते सुघोष जोशी यांनी दिली.पुणे लोकसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीसंदर्भात पुण्यातील कायद्याचे पदवीधर सुघोष जोशी यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर पोटनिवडणूक तातडीने घेण्याचा आदेश न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिला आहे. या पार्श्वभूमीवर जोशी यांनी ‘लोकसत्ता’शी संवाद साधताना निवडणूक आयोग कर्तव्य बजावत नसल्यामुळे आणि कायदेशीर बाबी पुढे आणण्यासाठीच याचिका दाखल केल्याचे स्पष्ट केले. सर्वोच्च न्यायालयातही हीच भूमिका मांडली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा