सत्तरच्या दशकातील प्रसिद्ध अभिनेते जॉय मुखर्जी, किशोर कुमार, अशोक कुमार आणि अभिनेत्री वहिदा रेहमान यांच्या अभिनयाने सजलेला ‘लव्ह इन बाँबे’ हा हिंदी चित्रपट शुक्रवारी तब्बल चाळीस वर्षांनी रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. या चित्रपटातील गाण्यांची मूळ एल.पी. (लाँग प्ले) रेकॉर्ड पुण्यातील एक संगीतप्रेमी सुहास गणपुले यांना सापडली आहे.
या चित्रपटात संगीतकार शंकर जयकिशन यांनी स्वरबद्ध केलेली चार गाणी असून ती किशोर कुमार यांनी गायली आहेत. गणपुले यांना जुन्या एल. पी. रेकॉर्डस् गोळा करण्याचा छंद असून त्यांना २००७ साली कोलकाता येथे ही रेकॉर्ड मिळाली. रेकॉर्डमधील गाणी ऐकल्यानंतर हा चित्रपट अजून प्रदर्शितच झाला नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. गणपुले यांच्या संग्रहात साठ व सत्तरच्या दशकातील सहा हजार ए. पी. रेकॉर्डस्चा समावेश आहे.
पडद्यावर न झळकलेल्या चित्रपटाची ४० वर्षांपूर्वीची रेकॉर्ड सापडली
‘लव्ह इन बाँबे’हिंदी चित्रपट शुक्रवारी तब्बल चाळीस वर्षांनी झळकणार आहे. या चित्रपटातील गाण्यांची मूळ एल.पी. (लाँग प्ले) रेकॉर्ड पुण्यातील एक संगीतप्रेमी सुहास गणपुले यांना सापडली आहे.
First published on: 02-08-2013 at 02:43 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suhas ganpule finds original l p of love in bombay