लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: येरवडा येथील खुल्या कारागृहात एका कैद्याने ब्लेडने वार करुन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत कैदी जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

Accused who escaped after killing friend arrested
मित्राचा खून करून पसार झालेला आरोपी गजाआड, ससून रुग्णालय परिसरात कारवाई
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
One died in an accident, accident Ovala Naka,
ठाणे : अपघातात एकाचा मृत्यू, ओवळा नाका येथील घटना
10th student commits suicide before pre-examination
पूर्वपरीक्षेपूर्वी दहावीतील विद्यार्थिनीची आत्महत्या
A young man attempted suicide from the employees building in the Police Commissionerate area
पोलिस आयुक्तालय परिसरातील कर्मचाऱ्यांच्या इमारतीवरून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
construction worker dies after gets trapped in jcb machine
जेसीबी यंत्राखाली सापडून बांधकाम मजुराचा मृत्यू
sucide pod controversy
सुसाईड पॉडमध्ये महिलेचा रहस्यमयी मृत्यू? मृत्यूचे कारण आत्महत्या की हत्या? यावरून सुरू झालेला नवा वाद काय?
thane Bhiwandi attempt to murder
ठाणे: सिगारेट मागितली म्हणून हत्येचा प्रयत्न

धनंजय राजाराम दिघे असे जखमी झालेल्या कैद्यााचे नाव आहे. याबाबत कारागृहातील अधिकारी निशा दिलीपकुमार श्रेयकर यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. धनंजय दिघे याला शिक्षा सुनावण्यात आली आहे. वर्तणूक चांगली असल्याने दिघेला खुल्या कारागृहात ठेवण्यात आले होते. दिघे याने कचऱ्यात पडलेले जुन्या ब्लेडने डाव्या हातावर वार केले. दिघे याच्या हातातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने त्याला तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले.

आणखी वाचा-पिंपरी: मोशीत जाहिरात फलकांसाठी झाडांची कत्तल

आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक लिंगे तपास करत आहेत.