पुणे : व्याजाने घेतलेल्या पैसे परत करण्यासाठी तगादा लावल्याने सहकार खात्यातील एका अधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी फरासखाना पोलिसांनी चौघांना अटक केली, असून तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश शंकर शिंदे (वय ५२, रा. बालाजी हाईट्स, मंगळवार पेठ) असे आत्महत्या केलेल्या अधिकाऱ्याचे नाव नाहे. शिंदे हे सहकार खात्यात अधिकारी आहेत. त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी विजय सोनी, बाळकृष्ण क्षीरसागर, गणेश साळुंखे, मनीष हाजरा यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात विजय सोनी यांचे वडील, पंधरकर, शंकर लक्ष्मण गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिंदे यांची पत्नी शोभना (वय ४७) यांनी या संदर्भात फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> Maharashtra Breaking News Live : दसरा मेळाव्यावरून शिंदे-ठाकरे गट आमने-सामने; राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर…

हेही वाचा >>> प्रेमसंबंधाच्या संशयातून तरुणाचे अपहरण; तरुणाला वसतिगृहात डांबून मारहाण करणारे तिघे अटकेत

आरोपी सोनी, क्षीरसागर, साळुंखे, हाजरा, पंधरकर गणेश शिंदे यांच्या ओळखीचे आहेत. आरोपींकडून शिदे यांनी आर्थिक विवंचनेतून ८४ लाख ५० हजार रुपये कर्ज प्रेमसंबंधाच्या संशयातून तरुणाचे अपहरण; तरुणाला वसतिगृहात डांबून मारहाण करणारे तिघे अटकेतव्याजाने घेतले होते. आरोपींनी व्याजाच्या पैशांवरुन शिंदे यांना त्रास देण्यास सुरूवात केली. आरोपी पंधरकर याने शिंदे यांना एक कोटी रुपयांचे कर्ज मंजुरीचे आमिष दाखविले होते. कर्जमंजुरीसाठी शिंदे यांनी पंधरकर याला पैसे दिले होते. ऐनवेळेस पंधरकरने कर्ज मंजुरीस नकार दिल्याने पतीला धक्का बसला. त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली, असे शिंदे यांची पत्नी शोभना यांनी फिर्यादीत म्हटले आहे. शिंदे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी जप्त करण्यात आली असून सहायक पोलीस निरीक्षक मनोज अभंग तपास करत आहेत.

हेही वाचा >>> खाद्यपदार्थ घरपोच पुरविणाऱ्या कामगाराकडून तरुणीचा विनयभंग

लोन ॲपच्या धमकीमुळे तरुणाची आत्महत्या

ॲपद्वारे घेतलेल्या कर्जाच्या तगाद्यामुळे विमाननगर भागात एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. सोहेल शेख (वय २५, रा. मदिना मशिदीजवळ, विमाननगर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत शेख याचे वडील जावेद अब्दुल शेख (वय ४८) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सोहेल शेखने लोन ॲपद्वारे कर्ज घेतले होते. कर्जाची परतफेड वेळेत न केल्याने लोन ॲपच्या कर्मचाऱ्यांनी सोहेलला धमकावण्यास सुरुवात केली. धमकी तसेच शिवीगाळ करण्यात आलेल्या मुलाने आत्महत्या केल्याचे सोहेलचे वडील जावेद यांनी फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी लोन ॲपच्या कर्मचाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक एन. एस. लहाने तपास करत आहेत.