दहावीतील विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना भोसरीत घडली आहे. आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप ठेवून शाळेच्या मुख्याध्यापकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयुष दुर्योधन गारळे (वय – १५, रा. गव्हाणे वस्ती, भोसरी) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. तर, हितेश शर्मा (वय-४०, दिघी रस्ता, भोसरी) असे मुख्याध्यापकाचे नाव आहे. याप्रकरणी आयुषच्या आईने भोसरी पोलिसांकडे फिर्याद दिली.

हेही वाचा >>>नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्रासाठी तारखेच्या अटीमुळे राज्यसेवेत काही उमेदवार अपात्र 

newborn babies killed jhansi marathi news
अन्वयार्थ : ‘उत्तम प्रदेशा’तल्या बाळांची होरपळ
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
thane body found hanged week ago in Kalwa has finally been identified
दवाखान्यातील चिठ्ठीमुळे कुजलेल्या मृतदेहाची ओळख पटली, आठवड्याभरापूर्वी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला होता मृतदेह
thane body found hanged week ago in Kalwa has finally been identified
कर्जाला कंटाळून मनपा अधिकाऱ्याची आत्महत्या 
pets cats
पाळीव प्राण्यांच्या विरहाच्या भीतीने नैराश्य, तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
Accused who escaped after killing friend arrested
मित्राचा खून करून पसार झालेला आरोपी गजाआड, ससून रुग्णालय परिसरात कारवाई
Kashmiri Girl Suicide
Kashmiri Girl Suicide : बॉयफ्रेंड नीट बोलत नाही म्हणून बँक ऑफ अमेरिकेतील काश्मिरी तरुणीची हैदराबादमध्ये आत्महत्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी दिघी रस्ता येथील प्रियदर्शनी इंग्रजी शाळेचे हितेश शर्मा हे मुख्याद्यापक आहेत. आयुष दंगामस्ती करतो, अभ्यास करत नाही. त्याला परीक्षेला बसू देणार नाही. शाळेतून काढून टाकेन, अशी धमकी ते आयुषला देत होते. त्यांच्या त्रासाला कंटाळून आयुषने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली, अशी तक्रार आयुषच्या आईने केली आहे. त्यानुसार, मुख्याध्यापकांवर भोसरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भवारी करत आहेत.