विवाहित असताना तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिची फसवणूक केल्याने तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना एनडीए रस्त्यावरील उत्तमनगर परिसरात घडली. या प्रकरणी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील (एनडीए) एका जवानाच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी गुरिंदर सिंग (वय ३५ रा. एनडीए क्वार्टर, खडकवासला) याला अटक करण्यात आली. याबाबत तरुणीच्या भावाने उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी गुरिंदर सिंग विवाहित होता. तो लष्करात जवान असून त्याची नियुक्ती राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत करण्यात आली आहे.

हेही वाचा >>>VIDEO : “जमिनीशी नाळ असलेलं राजकारणातील उत्तुंग व्यक्तिमत्त्व हरपलं”, गिरीश बापट यांच्या निधनानंतर देवेंद्र फडणवीसांनी वाहिली श्रद्धांजली!

अमरावती : शेअर बाजारात नफ्याचे आमिष; तब्बल २१.९२ लाखांची…
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
pushpa 2 song controversy
चेंगराचेंगरीनंतर ‘पुष्पा २’बद्दल नवा वाद, निर्मात्यांना युट्युबवरून हटवावं लागलं ‘हे’ लोकप्रिय गाणं; कारण काय?
loksatta editorial on rupee getting weaker day by day against the dollar
अग्रलेख : बबड्या रुपया, कारटा डॉलर
prathamesh parab regret for not getting enough screens
“महाराष्ट्रात स्क्रिन्स मिळत नाहीयेत यापेक्षा दुर्दैव…”, प्रथमेश परबने व्यक्त केली खंत; म्हणाला, “मायबाप प्रेक्षकांपर्यंत…”
Eknath shinde and ajit pawar (1)
NDA च्या बैठकीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रतिनिधी गैरहजर; एकनाथ शिंदे म्हणाले, “स्वार्थ भावनेने…”
Vishal Gawli News
Vishal Gawli : “विशाल गवळीने माझ्या मुलीला जवळ ओढलं, तिचं तोंड दाबलं आणि…”, पीडितेच्या आईने सांगितला दोन वर्षांपूर्वीचा ‘तो’ प्रसंंग
youth dies by suicide
प्रेयसीशी व्हिडीओ कॉलवर बोलत असताना तरुणानं केली आत्महत्या

सिंग एनडीएच्या वसाहतीत राहायला आहे. उत्तमनगर भागातील २१ वर्षीय तरुणीची सिंग याच्याशी ओळख झाली होती. त्याने तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते. तिला विवाहाचे आमिष दाखविले होते. तरुणीने त्याला विवाहाबाबत विचारणा केली. तेव्हा त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने राहत्या घरात प्रसाधनगृहात ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली.तरुणीच्या भावाने याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर सिंग याला अटक करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक ए. एस. चवरे तपास करत आहेत.

Story img Loader