पुणे : चारित्र्याचा संशय घेऊन पतीने छळ केल्याने पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना हडपसर भागात घडली. या प्रकरणी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनिता नागनाथ हिरावळे (वय ५९, रा. महात्मा फुले शाळेसमोर, गोंधळेनगर, हडपसर) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पती नागनाथ हिरावळे (वय ६५) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत अनिता यांची विवाहित मुलगी सारिका खरात (वय ३०, रा. सिद्धार्थनगर, ता. टेंभुर्णी, जि. सोलापूर) हिने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हेही वाचा – पुणे : दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू, महापालिकेच्या कचरा वाहतूक गाडीची धडक
अनिता यांचे पती नागनाथ चारित्र्याचा संशय घेत होते. चारित्र्याच्या संशयावरून नागनाथ अनिता यांचा छळ करत होते. छळामुळे अनिता यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. वडिलांच्या छळामुळे आईने आत्महत्या केल्याचे सारिका खरातने फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक सुवर्णा गोसावी अधिक तपास करत आहेत.