पुणे : येरवड्यातील कल्याणीनगर भागात एका युवतीने इमारतीतून उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना घडली. युवतीच्या मृ्त्यूचा धक्का बसल्याने नियोजित पतीने पिंपरीतील खराळवाडी भागात आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. दरम्यान, युवतीच्या आत्महत्येचा जबाबदार असल्या प्रकरणी येरवडा पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अस्मिता परशुराम धोत्रे (रा. खराळवाडी, पिपंरी.) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. येरवड्यातील कल्याणीनगर भागात अस्मिताने एका इमारतीतून उडी मारुन १४ मार्च रोजी आत्महत्या केली होती.  याप्रकरणी येरवडा पोलिसांनी सुरवातीला आकस्मित मृत्यू अशी नोंद केली होती. युवतीच्या नातेवाईकांनी मृतदेह येरवडा पोलीस ठाण्यात आणला. त्यानंतर पोलिसांनी अस्मिताच्या आत्महत्येस जबाबदार असणाऱ्या जाॅनी कुरियन, राजेश कांबळे, जनक शाही यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत अस्मिताची आई विमल परशुराम धोत्रे (वय ४५) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आरोपी आणि अस्मिता यांच्यात पैशांचा व्यवहार झाला होता. आरोपींनी पैशांचा तगादा लावल्याने मुलीने आत्महत्या केल्याचे धोत्रे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. अस्मिता पिंपरीतील खराळवाडी भागात राहायला आहे. तिचा विवाह एका युवकाशी निश्चित करण्यात आला होता. पुढील महिन्यात त्यांचा विवाह होणार होता. दरम्यान १४ मार्च रोजी अस्मिता ही कल्याणीनगर भागात मित्रांना भेटायला गेली होती. त्यानंतर तिने इमारतीतून उडी मारुन आत्महत्या केली. तिच्या मृत्यूच्या धक्क्यामुळे नियोजित पतीने पिंपरीतील खराळवाडी भागात आत्महत्या केली, अशी माहिती येरवडा पोलिसांनी दिली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suicide of a young woman jumping from a building pune print news rbk 25 ysh
Show comments