पुणे : सावत्र वडिलांच्या त्रासामुळे तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना कोंढवा भागात घडली. मुलाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन वडिलांविरुद्ध कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
शब्बीर उर्फ संदीप कसोटे (वय ३०, रा. लक्ष्मीनगर, कोंढवा) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी विजय सुमतराव कसोटे (रा. लक्ष्मीनगर, काेढवा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत संदीपची मावशी संगीता राजू बागवे (वय ५१, रा. लोहियानगर, गंज पेठ) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हेही वाचा – शहरबात… असा ‘अंमल’ बरा नव्हे!
हेही वाच – एका दिवसात पुणे महापालिकेने केली लाखोंची उधळण..! नक्की कशासाठी खर्च केले पैसे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीपच्या आईने आरोपी विजय कसोटे यांच्याशी दुसरा विवाह केला होता. कसोटे रिक्षाचालक आहे. संदीप काही काम करत नव्हता. तो अविवाहित होता. वडिलांशी त्याचे पटत नसल्याने कायम वाद व्हायचे. वडिलांनी त्याला त्रास दिल्याने त्याने ३ ऑक्टोबर रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. वडिलांच्या त्रासामुळे संदीपने आत्महत्या केल्याचे त्याची मावशी संगीता बागवे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक विकास बाबर तपास करत आहेत.