महाविद्यालयीन युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दौंड तालुक्यात घडली. सोमनाथ बाळू वेताळ (वय १७, रा. रोटी, ता. दौंड) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. वेताळ कुटुंबीय रोटी गावातील धुमाळ वस्ती परिसरात राहायला आहे. सोमनाथची आई दोन दिवसांपूर्वी कामानिमित्त पुण्याला आली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>>पुणे: हापूसच्या हंगामास दोन महिन्यांची प्रतीक्षा; देवगड हापूसची पहिली पेटी बाजारात

सोमनाथच्या आईने त्याच्या मोबाइलवर संपर्क साधला. मात्र, त्याने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे सोमनाथच्या आईने शेजाऱ्यांना याबाबतची माहिती दिली. सायंकाळी सोमनाथची आई घरी परतली. तेव्हा सोमनाथने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.
सोमनाथच्या आत्महत्येमागचे कारण समजू शकले नाही. काही दिवसांपूर्वी त्याला प्रेमप्रकरणातून मारहाण करण्यात आल्याची ग्रामस्थांनी दिली. वरंवडमधील एका महाविद्यालयात अकरावीत होता. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suicide of college youth in daund taluka pune print news rbk 25 amy