व्यवस्थापन शाखेत शिकत असलेल्या तरूणीने इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. बावधन येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेची इमारत येथे सायंकाळी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली. तिच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.
संध्याकुमारी किशनकुमार दिनकर (वय २६, रा. डहाणूकर कॉलनी, कोथरूड) असे आत्महत्या केलेल्या तरूणीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संध्याकुमारी ही सोमवारी सायंकाळी बावनध येथील स्टेट बँक शाखेच्या इमारतीत आली होती. त्या वेळी बँक बंद झालेली होती. मात्र, तरीही बँकेत काही काम असेल म्हणून संध्याकुमारीला येथील सुरक्षारक्षकाने काही विचारले नाही. फोनवर बोलत ती तशीच वरती गेली. सहाव्या मजल्यावरून तिने उडी मारून आत्महत्या केली. तिला तत्काळ उपचारासाठी जवळच्या खासगी रुग्णावलयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला.
संध्याकुमारी ही मूळची बिहारची असून ती पुण्यात भारती विद्यापीठ महाविद्यालयात एमबीए प्रथम वर्षांला शिकत होती. या ठिकाणीच तिचा भाऊ प्राध्यापक म्हणून काम करतो. यापूर्वी ती रांचीला शिक्षण घेत होती. एमबीए करण्यासाठी भावाकडे पुण्याला आली होती. या आत्महत्येमागील अद्याप कारण समजू शकलेले नाही. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक संजय ठेंगे हे अधिक तपास करत आहेत.
व्यवस्थापन शाखेचे शिक्षण घेणाऱ्या तरूणीची सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या
व्यवस्थापन शाखेत शिकत असलेल्या तरूणीने इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. बावधन येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेची इमारत येथे सायंकाळी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली. तिच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.
First published on: 13-03-2013 at 01:00 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suicide of mba girl student