हिंजवडी येथे एका आयटी कंपनीत संगणक अभियंता म्हणून काम करणाऱ्या निखील शेखर धोटे (वय २३, मूळगाव-चंद्रपूर) याने दहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. निखील हा चंद्रपूरचे आमदार सुभाष धोटे यांचा पुतण्या आहे. निखीलचे वडील हे चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निखील हा २०११ पासून हिंजवडी येथील एका प्रसिद्ध कंपनीत संगणक अभियंता म्हणून काम करत होता. पिंपळे सौदागर येथे भाडय़ाने घेतलेल्या सदनिकेत राहत होता. मंगळवारी सकाळी आठ वाजता तो कामावर गेला होता. िहजवडी येथील मल्टी लेबल पार्कीग लॉट या दहा मजली इमारतीच्या टेरेसवरून निखील याने उडी मारून आत्महत्या केली. त्याच्याकडे एक चिठ्ठी सापडली असून त्याने ‘जीवन हे फार कठीण आहे’ असे लिहिले आहे. याप्रकरणी िहजवडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक पी. आर. काठमोडे अधिक तपास करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suicide of software engineer in pune mla subhash dhotes nephew
Show comments