पिंपरी पालिकेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक पाठीशी घालत असल्याचे सांगत २० जुलैला झालेली सभा बेकायदेशीर असल्याने त्याची चौकशी करावी आणि त्या सभेचे कामकाज पुन्हा घेण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेच्या गटनेत्या सुलभा उबाळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
सोमवारी सभेचे कामकाज सुरू असताना शिस्तभंग केल्याचा ठपका ठेवून महापौर शकुंतला धराडे यांनी सुलभा उबाळे, शारदा बाबर, आशा शेंडगे या तीन नगरसेविकांना निलंबित केले. त्यासंदर्भात, उबाळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली. पालिकेचे सेवानिवृत्त अधिकारी डॉ. आनंद जगदाळे यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप सिध्द झालेले आहेत. त्यांच्यावरील आरोपांबाबत सभेत आवाज उठवला म्हणून महापौरांनी निलंबनाची कारवाई केली. ही कारवाई सभागृहात न करता महापौरांनी स्वत:च्या दालनात केली. मुळात सोमवारी (२० जुलै) झालेली सभा बेकायदेशीर आहे. ही नियमबाह्य़ सभा रद्द करावी, त्याची नगरविकास खात्याकडून चौकशी करावी आणि या सभेचे कामकाज पुन्हा घेण्याचे आदेश महापौरांना द्यावेत, अशी मागणी उबाळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
..पिंपरी पालिकेची ‘ती’ सभाच बेकायदेशीर – सुलभा उबाळे
२० जुलैला झालेली सभा बेकायदेशीर असल्याने त्याची चौकशी करावी, अशी मागणी शिवसेनेच्या गटनेत्या सुलभा उबाळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
First published on: 22-07-2015 at 03:18 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sulabha ubale complaints about pcmcs meeting