सातत्याने कडक ऊन सुरू झाले नसले, तरी उन्हाळा बाधून थकवा आणि शरीरातील पाणी कमी होण्याचा त्रास शहरात मोठय़ा प्रमाणावर होताना दिसू लागला आहे. उन्हामुळे अचानक बेशुद्धावस्था येण्यासारखी लक्षणे दाखवणारा उष्माघात होण्याइतके कडक तापमान अजून दिसत नसले, तरी त्यापासून बचाव करण्यासाठी वेळीच काळजी घेण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.
गेल्या काही दिवसांमधील विषम हवामान संपून उन्हाचा तडाखा हळूहळू वाढू लागला आहे. सातत्याने कडक तापमान दिसत नसले तरी त्याची झलक आताही पाहायला मिळत आहे. अशा वातावरणात ऊन बाधून त्याचा त्रास होण्याचे प्रमाण मोठे असते. उन्हाचा त्रास झालेल्या रुग्णांमध्ये सध्या शरीरातील पाणी कमी होणे (डीहायड्रेशन) आणि थकवा येणे ही लक्षणे प्रामुख्याने पाहायला मिळत असल्याचे निरीक्षण डॉ. मंजिरी साबडे यांनी नोंदवले. त्या म्हणाल्या, ‘‘डोळे येण्याचा त्रासही लहान मुलांमध्ये दिसत आहे. ज्यांना उन्हात बाहेर फिरावे लागते त्यांच्यात ‘सन बर्न’सदृश लक्षणेही दिसत आहेत. यात अतिउन्हामुळे चेहऱ्याला आणि त्वचेला खाज सुटते, त्वचा लाल होणे, त्यावर पुरळही उठते. उन्हामुळे नाकातून रक्त येण्याची प्रकृती असलेल्या रुग्णांना घोळणा फुटण्याचा त्रास झालेला बघायला मिळत आहे. उष्माघात होण्याइतके कडक तापमान सध्या
‘वाढत्या उन्हामुळे बाहेरचे दूषित पाणी पिण्याचे प्रमाण वाढले असून त्यामुळे ‘गॅस्ट्रोएंटरिटिस’ म्हणजे जुलाब आणि उलटय़ा यांचे रुग्णही मोठय़ा प्रमाणावर दिसत आहेत,’ असेही त्यांनी सांगितले.
उष्माघाताचा त्रास प्रामुख्याने एप्रिल ते जून या कालावधीत होतो. हा त्रास टाळण्यासाठी पालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. एस. टी. परदेशी यांनी काही मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. उष्माघाताच्या रुग्णांना औषधोपचारांसाठी त्वरित रुग्णालयात दाखल करावे असेही डॉ. परदेशी यांनी सांगितले.
उष्माघाताची लक्षणे
उन्हापासून जरा सांभाळून!
सातत्याने कडक ऊन सुरू झाले नसले, तरी उन्हाळा बाधून थकवा आणि शरीरातील पाणी कमी होण्याचा त्रास शहरात मोठय़ा प्रमाणावर होताना दिसू लागला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 26-03-2014 at 03:25 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Summer exhaustion sunstroke