लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : शहर आणि परिसरातून थंडीने माघार घेतली आहे. गेल्या दोन दिवसांपासून शहराचे कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसवर आहे. किमान तापमानही सरासरी १५ अंश सेल्सिअसवर आहे. सोमवारी मगरपट्ट्यात सर्वाधिक २१ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरात सोमवारी कमाल तापमान सरासरी ३५ अंश सेल्सिअस होते. शिवाजीनगरमध्ये ३५.३, पाषाणमध्ये ३४.४, लोहगावात ३४.९, चिंचवडमध्ये ३५.२, लवळेत ३७.५ आणि मगरपट्ट्यात ३५.५ कमाल तापमानाची नोंद झाली आहे. कमाल तापमानात होत असलेल्या वाढीसह किमान तापमानातही मोठी वाढ झाली आहे.
आणखी वाचा-बासमतीच्या निर्यातीत मोठी वाढ; आर्थिक वर्षाअखेरीस निर्यातीत १५ टक्क्यांनी वाढ शक्य
शिवाजीनगरमध्ये १४.७, पाषाणमध्ये १५.४, लोहगावत १७.१, चिंचवडमध्ये १९.६ आणि मगरपट्ट्यात २१.० अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. पहाटे काहीकाळ थंड वारे वाहत आहेत. पण, सकाळी आठ वाजल्यापासूनच उन्हाचा चटका जाणवू लागला आहे.
महिनाअखेरपासून तापमान वाढणार
राज्यात मागील दोन दिवसांपासून दुपारी तीनचे तापमान सरासरी ३४.० अंश सेल्सिअसवर गेले आहे. किमान तापमानही सरासरी २०.० अंश सेल्सिअवर आले आहे. उत्तर भारतात सध्या प्रचंड बर्फवृष्टी, गारपीट आणि पाऊस सुरू आहे. त्याचा परिणाम पुढील दोन-तीन दिवसांनंतर राज्यात दिसू शकतो. महिनाअखेरीपासून तापमानात वाढ होण्याचा अंदाज आहे, अशी माहिती हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. माणिकराव खुळे, यांनी दिली.