पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील बारामती लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी आज जोरदार शक्ती प्रदर्शन करित उमेदवारी अर्ज दाखल केला.
सुनेत्रा पवार यांनी निवडणूक निर्णय अधिकार्यांकडे प्रतिज्ञा पत्र सादर केले आहे. त्यामध्ये अनेक माहिती समोर आली असून २ कोटी ३१ लाख २ हजार १८१ रुपयांच कर्ज सुनेत्रा पवार दिले आहे. त्यामध्ये कुटुंबातील सदस्यांचा देखील समावेश आहे. यामध्ये पती अजित पवारांना ६३ लाख २० हजार ३०३ रुपये, तर शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार ५० लाख रुपये आणि सुप्रिया सुळे यांना ३५ लाख रुपये कर्ज दिल्याची माहीती समोर आली आहे.
आणखी वाचा-सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर अजित पवार ॲक्शन मोडवर
सुनेत्रा पवार यांच्या प्रतिज्ञा पत्रातील काही विशेष मुद्दे
- वैयक्तिक देणी कर्ज १२ कोटी ११ लाख १२ हजार ३७४
- २०२२-२३ मधील आर्थिक उत्पन्न ४ कोटी २२ लाख २१ हजार ०१०
- जंगम मालमत्ता १२ कोटी ५६ लाख ५८ हजार ९८३
- स्थावर मालमत्ता ५८ कोटी ३९ लाख ४० हजार ७५१
- स्व संपादित मालमत्ता १८ कोटी ११ लाख ७२ हजार १८५
- बँक खात्यातील ठेवी २ कोटी ९७ लाख ७६ हजार १८०
- शेअर्स/ बॉन्ड १५ लाख ६९ हजार ६१०
- बचत पत्रे ५७ लाख ७६ हजार ८७७
- वाहने ट्रॅक्टर, दोन ट्रेलर १० लाख ७० हजार
- दागिने ३४ लाख ३९ हजार ५६९
- इतर मालमत्ता ६ कोटी ५ लाख १८ हजार ११६