पुणे : पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सहायक पोलीस आयुक्तपदी सुनील पवार यांची नियुक्ती करण्याचे आदेश पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी शुक्रवारी रात्री दिले. गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त गजानन टोम्पे यांची विश्रामबाग विभागात सहायक पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. पोलीस आयुक्तालयातील प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त राजेंद्र गलांडे यांची सिंहगड रस्ता विभागात सहायक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. शहर पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची बदली करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बदली झालेले पोलीस निरीक्षकांची नावे आणि कंसात नवीन नियुक्तीचे ठिकाण पुढीलप्राणे- भरत जाधव, (सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखा), विजय कुंभार (वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारती विद्यापीठ पोलीस ठाणे), मनोहर इंडेकर (वाहतूक शाखा), ब्रह्मानंद नाईकवाडी (वरिष्ठ पोलीस निरीक्षक चतु:शृंगी पोलीस ठाणे), संदीप भोसले (पोलीस निरीक्षक, गुन्हे, भारती विद्यापीठ पोलीस ठाणे), सुनील जाधव (वाहतूक शाखा), प्रताप मानकर (खंडणी विरोधी पथक-२), श्रीहरी बहिरट (गुन्हे शाखा युनिट-२), बालाजी पांढरे (गुन्हे शाखा युनिट-१), संतोष पाटील (वरिष्ठ पोलीस निरीक्षक बंडगार्डन पोलीस ठाणे), भाऊसाहेब पठारे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक वानवडी पोलीस ठाणे), चंद्रशेखर सावंत (पोलीस आयुक्तांचे वाचक )