पुणे: हिंदी सिनेसृष्टीतील अभिनेते सुनील शेट्टी त्याच्या फिटनेससाठी विशेष ओळखला जातो. “मी अजून ६२ वर्षांचा वाटत नाही. याचं कारण माझा फिटनेस आहे. त्यामुळे माझ्यासाठी ज्येष्ठत्व हे शंभर वर्षाच्या पुढेच असेल.” असं त्याने म्हटलं आहे. तरुणांनी व्यसनापासून दूर राहावं असं आवाहन त्याने लोणावळ्यात केलं आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी संकल्प नशा मुक्ती मॅरेथॉनचं आयोजन केलं होतं. सुनील शेट्टीने या मॅरेथॉनमध्ये सहभाग नोंदवला.
सुनील शेट्टीने सहभागी झालेल्या तरुणांना संबोधित केलं, “मी अजूनही ६२ वर्षांचा वाटत नाही असं म्हणत माझ्यासाठी जेष्ठ नागरिकत्व हे ८० वर्षाला असेल. परंतु, मी असाच फिट राहिलो तर शंभर वर्षानंतरच माझा ज्येष्ठ नागरिक म्हणून उल्लेख होईल. हे केवळ आणि केवळ व्यसनापासून दूर राहिल्याने शक्य झालं आहे. त्यामुळे तुम्ही देखील व्यसनापासून दूर राहा.” असे आवाहन सुनील शेट्टीने तरुणांना केलं आहे.
आणखी वाचा-हावडा-दुरंतो एक्सप्रेसमधील थरार : पुणे पोलिसांच्या हातावर तुरी, धावत्या रेल्वेगाडीतून गुन्हेगार पसार
“अनेकदा आपण व्यसन करत असतो तेव्हा आपला मुलगा आपल्याला पाहतो. तो देखील पुढे जाऊन व्यसनी होऊ शकतो. त्यामुळे आपल्या कुटुंबाचा विचार करून व्यसन करावे.” असं शेट्टीने म्हटलं आहे. त्यामुळे तरुणांनी व्यसनापासून दूर राहा असे आवाहन त्याने केले आहे. सुनील शेट्टीने संकल्प नशा मुक्ती मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवून स्पर्धेला सुरुवात केली. मॅरेथॉन स्पर्धा पुणे ग्रामीण पोलिसांनी आयोजित केली होती. यावेळी पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिकसह इतर पोलिस अधिकारी उपस्थित होते.