पुणे : ‘सैन्यदलाच्या सेवेत असताना माझ्या २३ ठिकाणी बदल्या झाल्या. पहाटेपासूनच घराबाहेर असल्यामुळे मुला-मुलीचे लहानपण पाहिले नाही. अनेकदा आमचे बोलणे देखील होत नसे. कुटुंबाकडे लक्ष देत पत्नीने सर्व काही केल्यामुळे मी देशरक्षणार्थ कार्य करु शकलो’, अशी कृतज्ञ भावना हवाई दलातील एअर मार्शल (निवृत्त) सुनील सोमण यांनी व्यक्त केली.सनई-चौघड्याच्या गजरात, रांगोळी आणि दारावर तोरण लावून मराठमोळ्या पद्धतीने हवाई दलातील एअर मार्शल (निवृत्त) सुनील सोमण या निवृत्त सेनाधिकाऱ्याचा सन्मान करून सैनिक मित्र परिवारातर्फे विजयादशमी साजरी करण्यात आली. पुणेरी पगडी, तिरंगी उपरणे, सन्मानचिन्ह, श्रीफळ, मिठाई असे या सन्मानाचे स्वरुप होते.

सोमण यांच्या निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमास सोमण यांच्या पत्नी रश्मी सोमण, ज्येष्ठ बँकिंगतज्ज्ञ सुभाष मोहिते, किरण पाटोळे, आनंद सराफ, शिरीष मोहिते, विष्णू ठाकूर, नितीन पंडित, कल्याणी सराफ, स्वाती ओतारी, प्रज्ञा काळे या वेळी उपस्थित होत्या. भरत खळदकर यांनी सनई-चौघडावादन केले. सोमण म्हणाले,  १९७६ पासून हवाई दलात कार्यरत असताना मी युद्ध सहभाग, तातडीच्या मोहिमा, लढाऊ विमान दलाचे नेतृत्व, नवोदितांना प्रशिक्षण, लष्कराच्या विशेष समितीचे सल्लागार असा प्रदीर्घ सहभाग घेतला. सैनिक मित्र परिवाराने या कार्याची दखल घेत केलेला सन्मान माझ्यासाठी खूप वेगळा आहे.’

Mahavikas Aghadi split from Parvati Assembly Constituency Pune news
‘पर्वती’वरून महाविकास आघाडीत तिढा
Decision of one lakh citizens from Kasba to boycott the elections
एक लाख कसबेकरांचा निवडणुकीवर बहिष्काराचा निर्णय
Most aspirants from Congress in Pune Cantonment and Shivajinagar constituencies
पुण्यात काँग्रेसमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी
Harshvardhan Patil in possession of Indapur Congress Bhawan
हर्षवर्धन पाटील यांच्याकडे इंदापूर काँग्रेस भवनाचा ताबा?
fire in building on Prabhat road Seven people including an elderly woman were rescued
पुणे : प्रभात रस्त्यावर इमारतीत आग; ज्येष्ठ महिलेसह सात जणांची सुटका
baba Siddiqui murder case leads to Pune text circulated on social media prior to murder
Baba Siddique Shot Dead : सिद्दीकींच्या हत्येच्या कटाचे धागेदोरे पुण्यापर्यंत! हत्येपूर्वी एकाकडून समाज माध्यमात मजकूर प्रसारित
risk of brain stroke has increased Mission Brain Attack started in Pune
‘ब्रेन स्ट्रोक’चा धोका वाढला! ‘मिशन ब्रेन अॅटॅक’ची पुण्यात सुरूवात; जाणून घ्या या मोहिमेविषयी…
Builders have an upbeat picture of rising home sales in the near future
पुण्या-मुंबईत घरांच्या खरेदीसाठी अच्छे दिन? बांधकाम क्षेत्र काय म्हणतंय जाणून घ्या…
body of young man found in a box in Hadapsar has been identified
हडपसरमध्ये खोक्यात सापडलेल्या तरुणाच्या मृतदेहाची ओळख पटली