Chinchwad By Election: चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीसाठी आज ५१० मतदान केंद्रावर मतदान पार पडत आहे. भाजपा, महाविकास आघाडी आणि अपक्षासाठी ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची आहे. सकाळी शांततेत पार पडत असलेल्या मतदानाला गालबोट लागले आहे. पिंपळे गुरव च्या ३५३ आणि ३५४ मतदान केंद्रावर बंडखोर राहुल कलाटे यांचे समर्थक आणि भाजपाचे माजी नगरसेवक एकमेकांमध्ये भिडले आहेत. यामुळं काही काळ तणावाचे वातावरणात होते. पोलिसांनी मध्यस्थी करत दोघांची हाणामारी सोडवली.
हेही वाचा- Kasba By Election : मतदान यादीतील नावाचा गोंधळ
चिंचवडमध्ये आज पोटनिवडणूकीसाठी मतदान पार पडत आहे. दुपारी एक पर्यंत २०.६८ टक्के मतदान झाले आहे. चिंचवड पोटनिवडणूक ही अत्यंत चुरशीची असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी चे सर्वेसर्वा शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील यांनी चिंचवड पोटनिवडणूकीसाठी प्रचार सभा, रॅली घेऊन प्रचार केला होता. आगामी निवडणूकीची लिटमस टेस्ट म्हणून या निवडणूकीकडे पाहिले जात आहे. नेत्यांनी एकमेकांवर टीका केल्याचे देखील पाहायला मिळालं.
हेही वाचा- Kasba By Election : कसब्यात नवमतदारांनीही बजावला मतदानाचा हक्क!
आज पोटनिवडणूकीचे मतदान होत असून त्याला गालबोट लागले. बंडखोर राहुल कलाटेंचे समर्थक आणि भाजपाचे माजी नगरसेवक एकमेकांना भिडले. काही काळ यामुळे तणाव निर्माण झाला होता. स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी हा वाद मिटवला. यानंतर मात्र पोलिसांनी अधिक ची कुमक मागवण्यात आली होती. चिंचवड विधानसभा मतदारसंघात १३ संवेदनशील मतदारसंघ असून तिथं देखील मोठा पोलीस फाटा आहे.