काही दिवसांपूर्वी शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तारांनी सुप्रिया सुळेंबद्दल वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर सत्तार आता बारामती दौऱ्यावर येत आहेत. सत्तारांच्या या दौऱ्यावर सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे. “जे कोणी नेते बारामतीमध्ये येतात. त्या सर्व नेत्यांचे आम्ही स्वागतच केले आहे आणि त्यांचेही अर्थातच स्वागतच होईल. आमच्यावर अतिथी देवो भव असे संस्कार झाले आहेत. त्यामुळे जे येतील त्यांचे स्वागत असल्याचे सुळे यांनी म्हटले आहे. सुप्रिया सुळे यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेऊन मतदार संघातील प्रश्नाबाबत चर्चा केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in