पुणे : जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी दिला जात नाही आणि आम्ही सुचविलेली काम नाकारली जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. त्यावेळी आमदार अशोक पवार, आमदार संजय जगताप आणि आमदार संग्राम जगताप हे सहभागी झाले होते. यावेळी राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा : ‘तुमच्या हद्दीत महापालिकेला पाणी देणे शक्य नाही’; पाण्यावरून महापालिका आणि पीएमआरडीए आमने-सामने

यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या की, राज्यात आजवर अनेक पक्षांचे सरकार आले. त्या प्रत्येक राज्य सरकार मार्फत सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींना निधी देताना कायम समान न्याय देण्याचे काम करण्यात आले. मात्र आता मागील काही महिन्यांपासून पुणे जिल्ह्यातील विरोधी पक्षातील लोक प्रतिनिधींना जिल्हा नियोजन समिती मार्फत कोणत्याही प्रकारचा निधी दिला जात नाही. तसेच मतदार संघात सुचविलेली कामे देखील केली जात नाही. त्यामुळे सत्ताधारी पक्षाकडून संविधान विरोधी काम सुरू आहे. या सरकारच्या कार्यपद्धतीचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही आंदोलन करत असल्याचे सांगत पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यावर सुळे यांनी अप्रत्यक्षपणे टोला लगावला.