पुणे : व्हॉट्सअ‍ॅप आणि ईमेल हॅक होण्याच्या घटना वारंवार समोर येत असतात. सरकारी अधिकाऱ्यांचीही खाती हॅक झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. आता खासदार सुप्रिया सुळे यांचा फोन आणि व्हॉट्सअ‍ॅप हॅक झाल्याचे समोर आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – पुणे : वाहने फोडली तिथेच पोलिसांनी काढली धिंड, येरवडा पोलिसांची कारवाई

हेही वाचा – पुणे : किरकोळ कारणातून टोळक्याकडून पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला

सुळे यांनी स्वतःच एक्स या समाजमाध्यमाद्वारे ही माहिती दिली. माझा फोन आणि व्हॉट्सअ‍ॅप हॅक झाला आहे. कोणीही मला मेसेज करू नये. या बाबत मी पोलीस तक्रार करत आहे. कृपया याची नोंद घ्यावी, असे सुळे यांनी नमूद केले आहे. सुळे यांच्यासारख्या खासदाराचा फोन आणि व्हॉट्सअ‍ॅप हॅक झाल्याच्या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Supriya sule phone whatsapp hacked self provided information pune print news ccp 14 ssb