जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. या सोहळ्यासाठी श्री क्षेत्र देहू येथे आज पंतप्रधान मोदी आले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह कार्यक्रमाच्या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी देहूचे शिळा मंदिर हे केवळ भक्तीच्या शक्तीचेच केंद्र नाही तर भारताच्या सांस्कृतिक भविष्याला देखील प्रशस्त करते असे म्हटले. आषाढी वारीसाठी सोमवारी (२० जून) तुकोबांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होणार असून, त्यापूर्वी लोकार्पणाचा सोहळा होत असल्याने वारकऱ्यांमध्येही उत्साहाचे वातावरण दिसून आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मात्र या कार्यक्रमानंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे. या कार्यक्रमामध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण झाले. यामुळे अजित पवार यांना भाषणाची संधी का देण्यात आली नाही असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. अजित पवारांचे भाषण न झाल्याने पंतप्रधान मोदीही आश्चर्यचकित झाले. त्यांनी हाताने इशारा करुन याबाबत सूचना केली होती.

संत तुकारामांचे अभंग आम्हाला ऊर्जा देतात आणि मार्ग दाखवतात – पंतप्रधान मोदी

या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषण करण्यासाठी परवानगी न देणे हा संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान झाला असून हा प्रकार गंभीर आणि वेदना देणारा आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अमरावती येथे पत्रकारांशी बोलताना दिली. “पंतप्रधानांच्या उपस्थितीत देहू येथे कार्यक्रम झाला. या ठिकाणी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस यांना भाषणासाठी संधी देणे हा भाजपाचा अंतर्गत प्रश्न आहे. पण, अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत,” असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

“…म्हणून आपले पंतप्रधान खऱ्या अर्थाने वारकरी”; PM मोदींच्या देहू दौऱ्यात फडणवीसांचे उद्गार

“या कार्यक्रमामध्ये अजित पवारांचे भाषण व्हावे यासाठी प्रोटोकॉल म्हणून पंतप्रधान कार्यालयाला विनंती करण्यात आली होती. पण पंतप्रधान कार्यालयाने विनंती स्वीकारली नाही. पुन्हा एकदा महाविकास आघाडीवर अन्याय करण्यात आला आहे. आमच्या राज्याचा आमचा नेता व्यासपीठावर आहे. तिथे विरोधी पक्षनेत्यांना भाषण करु देता पण आमच्या नेत्यांना भाषण करु देत नाहीत. ही दडपशाही असून आमच्या नेत्याचा आवाज दाबण्याचे काम केले आहे. प्रोटोकॉलनुसार अजित पवारांना भाषण करण्याची संधी द्यायला हवी होती,” असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

अजित पवार हे फडणवीसांसारखे भाषणासाठी हापापलेले नसतात – अमोल मिटकरी</strong>

या घटनेनंतर या कार्यक्रमामध्ये वारकऱ्यांना बोलू देण्यात आले असे भाजपाने म्हटले. त्यावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी प्रतिक्रिया दिली आहे. “देवेंद्र फडणवीस हे वारकरी नाहीत ते राजकीय पुढारी आहेत. हे बालिश आणि हास्यास्पद वक्तव्य असल्याचे भाजपा म्हणत असेल तर सुप्रिया सुळेंनी उपमुख्यमंत्री कार्यालयातून आलेली माहिती पत्रकारांनी दिली आहे. उपमुख्यमंत्री कार्यालयातून आलेल्या प्रोटोकॉलचे पालन झालेले नाही. अजित पवार हे फडणवीसांसारखे भाषणासाठी हापापलेले नसतात. दोघांमध्ये खूप फरक आहे. अजित पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असतील तर पंतप्रधान मोदींनी त्यांना मनोगत व्यक्त करण्यासाठी विनंती करायला पाहिजे होती. भाजपाने आणि त्यांच्या आध्यात्मिक आघाडीने महाराष्ट्राची माफी मागावी,” अशी मागणी अमोल मिटकरी यांनी एबीपी माझासोबत बोलताना केली.