पुणे : बारामती लोकसभा निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे अजित पवार यांच्या भेटीसाठी काटेवाडी येथे दाखल झाल्या. या भेटीची चर्चा वेगाने सुरू झाली असून भेटीबाबत तर्क वितर्क लढविले जात आहेत.

बारामती लोकसभा मतदारसंघासाठी मतदान सुरू झाले आहे. या मतदारसंघात सुप्रिया सुळे यांच्यापुढे अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचे आव्हान आहे. नणंद- भावजय अशी ही लढत आहे. निवडणूक प्रचारावेळी सुळे आणि पवार यांनी एकमेकांवर जोरदार प्रहार केला होता. बारामतीची लढत कौटुंबिक नाही तर ती वैचारिक आहे असा दावाही करण्यात आला होता.

हेही वाचा – माझी आई माझ्यासमवेत, अजित पवार असे का म्हणाले?

हेही वाचा – शरद पवार यांचे मुंबईऐवजी माळेगाव येथे मतदान

या पार्श्वभूमीवर अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांची काटेवाडीमधील भेटीची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात या भेटीबाबत अंदाज लढवण्यात येत आहेत.

Story img Loader