Supriya Sule Whatsapp Hacked, Hacker Demands 400 usd : व्हॉट्सअ‍ॅप आणि ईमेल हॅक होण्याच्या घटना वारंवार समोर येत असतात. सरकारी अधिकाऱ्यांचेही फोन हॅक झाल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. अशातच आता खासदार सुप्रिया सुळे यांचा फोन आणि व्हॉट्सअ‍ॅप हॅक झाल्याचं वृत्त रविवारी (११ ऑगस्ट) समोर आलं होतं. त्यानंतर सुळे यांनी पुणे पोलिसांत तक्रार दाखल केली होती. सायबर पोलिसांच्या मदतीने त्या त्यांचं अकाऊंट रिकव्हर करण्याचा प्रयत्न करत होत्या. दरम्यान, हॅकरने त्यांचं अकाऊंट परत देण्याच्या बदल्यात त्यांच्याकडे ४०० डॉलर्सची (तब्बल ३३,५०० रुपये) मागणी केली. त्यांचं व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट दुसऱ्या डिव्हाईसवरून चालवलं जात होतं. दरम्यान, सायबर पोलिसांनी सुप्रिया सुळे यांचं अकाउंट रिकव्हर करून दिलं आहे.

खासदार सुळे यांनी स्वतःच एक्स या समाजमाध्यमाद्वारे माहिती दिली होती की “माझा फोन आणि व्हॉट्सअ‍ॅप हॅक झालं आहे. कोणीही मला मेसेज करू नये. याबाबत मी पोलीस तक्रार करत आहे. कृपया याची नोंद घ्यावी”. सुप्रिया सुळे यांच्यासारख्या खासदाराचा फोन व व्हॉट्सअ‍ॅप हॅक झाल्याच्या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.

WhatsApp New Feature for meta AI
WhatsApp New Feature: व्हॉट्सअ‍ॅपचे ‘हे’ नवीन फीचर पाहिलंत का? मदत मागणं होईल सोपं, पाहा कसा होईल फायदा
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Two people from Hadapsar area have cheated of 28 lakhs by cyber thieves
सायबर चोरट्यांकडून दोघांची २८ लाखांची फसवणूक
Supriya Sule and Saif Ali Khan
Attack on Saif Ali Khan : सैफ अली खानवर चाकू हल्ला, खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाल्या…
Burglary in Revenue Colony on Jangli Maharaj Road Pune news
पुणे: जंगली महाराज रस्त्यावरील रेव्हेन्यू काॅलनीत घरफोडी
economic crime branch raided Torres Poisar office in Kandivali
टोरेसच्या कांदिवलीतील कार्यालयावर छापे
WhatsApp users in India can use UPI for payments
आता WhatsApp Pay द्वारे थेट करा UPI पेमेंट; पैशांची देवाण-घेवाण होईल सोपी; कसे ते घ्या जाणून…
Torres Scam in Mumbai
Torres Scam in Mumbai : टोरेस कंपनीत १३ कोटी बुडाले… भाजी विक्रेत्याने सांगितलं नेमकं काय झालं?

व्हॉट्सॲप रिकव्हर झाल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी एक्सवर एक पोस्ट केली. त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की माझे व्हॉट्सॲप सुरू झाले आहे. व्हॉट्सॲप टीमने यासाठी अतिशय मोलाचे सहकार्य केले. याबद्दल टिम व्हॉट्सॲप व पुणे ग्रामीण पोलिसांचे मनापासून आभार. दरम्यानच्या काळात कुणी मेसेज केले असतील तर त्यांना मला या तांत्रिक बिघाडामुळे रिप्लाय करता आला नाही, याबद्दल क्षमस्व.

हे ही वाचा >> Sharad Pawar : मराठा-ओबीसी आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी शरद पवार मैदानात, मुख्यमंत्री व केंद्र सरकारला म्हणाले…

सुप्रिया सुळे यांचं नागरिकांना आवाहन

दरम्यान, खासदा सुळे यांनी नागरिकांना एक सल्ला दिला आहे. त्या म्हणाल्या, नागरीकांना माझी विनंती आहे की आवश्यक ती सर्व काळजी घेऊनही माझे व्हॉट्सॲप हॅक झाले होते. कृपया आपण सर्वजण डिजीटल सुरक्षेविषयी आवश्यक ती काळजी घ्या. व्हॉट्सॲप वापरताना टू फॅक्टर व्हेरीफिकेशन करुन घ्या. आपले पासवर्ड, ओटीपी कुणालाही देऊ नये. तसेच अनोळखी क्रमांकावरुन आलेल्या लिंक क्लिक करु नये. डिजिटल सुरक्षा ही अतिशय महत्त्वाची बाब असून आपण आवश्यक ती काळजी घायला हवी.

दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी हॅकरकडून अकाऊंट परत मिळवण्यासाठी पैसे दिले नाहीत. पोलिसांनी व व्हॉट्सॲप टीमने त्यांचं अकाऊंट परत मिळवून दिलं आहे.

Story img Loader