पुणे : वर्धा येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेने ज्येष्ठ पत्रकार-साहित्यिक सुरेश द्वादशीवार, प्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले आणि प्रसिद्ध कवी प्रवीण दवणे यांची नावे सुचविली आहेत.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या वर्धापनदिनानिमित्त गोव्यातील फोंडा येथे शनिवारी (१५ ऑक्टोबर) होणाऱ्या बैठकीत आगामी संमेलनाध्यक्षाची एकमताने निवड होणार आहे. संमेलन वर्ध्याला होत असल्याने गांधी-विनोबा विचारांशी नाळ असलेल्या साहित्यिकाची निवड केली जावी, अशी अपेक्षा साहित्य वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा >>> पुणे पोलीस मानसिकदृष्ट्या सक्षम

Ajit Pawar and Suresh Dhas
Ajit Pawar : सुरेश धस यांनी उल्लेख केलेली मुन्नी कोण? विचारताच अजित पवार संतापून म्हणाले, “असल्या फाल्तू…”
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Rohit Pawar On Ajit Pawar group
Rohit Pawar : अजित पवार गटाकडून शरद पवारांच्या खासदारांना ‘ऑफर’? रोहित पवारांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “अधिवेशन होतं तेव्हा…”
Tejswini Pandit
“लवकर बरं व्हायचं आहे”, तेजस्विनी पंडितला नेमकं झालंय तरी काय? पोस्टवर स्वप्नील जोशी, सिद्धार्थ जाधवने केल्या कमेंट्स
bjp membership registration campaign target to add 50 lakh new members in maharashtra
भाजप सदस्यनोंदणी ! ‘ हे ‘ आमदार अव्वल तर ‘ हे ‘ पिछाडीवर
Santosh Deshmukh murder case, Devendra Fadnavis ,
“आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केला तरी…”, संतोष देशमुख हत्या प्रकरणावरुन मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा
Suresh Dhas and ajit pawar
Suresh Dhas : “अजितदादा, क्या हुआ तेरा वादा…”, सुरेश धसांनी परभणीची सभा गाजवली; ‘बिनमंत्र्यांचा जिल्हा’ ठेवण्याची मागणी!
Suresh Dhas
Suresh Dhas : “पहिली पसंती मुख्यमंत्र्यांना, अजित पवार झाले तर…”, बीडच्या पालकमंत्री पदाबाबत सुरेश धस यांचं स्पष्ट मत

मराठवाडा साहित्य परिषदेने द्वादशीवार,  यांच्यासह ‘बारोमास’कार सदानंद देशमुख आणि ज्येष्ठ साहित्यिक व निग्रो साहित्याचे अभ्यासक डॉ. जनार्दन वाघमारे ही तीन नावे अध्यक्षपदासाठी सुचविली आहेत. साहित्य महामंडळाच्या घटना दुरुस्ती नंतर गेल्या चार वर्षांपासून साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक टाळून एकमताने बिनविरोध निवड केली जात आहे. घटना दुरुस्ती झाल्यानंतर पहिल्या वर्षी हा बहुमान प्रसिद्ध कवयित्री डॉ. अरुणा ढेरे यांना मिळाला होता. त्यानंतर फादर फ्रान्सिस दिब्रिटो, ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ व विज्ञान कथालेखक डॉ. जयंत नारळीकर या महाराष्ट्र साहित्य परिषदेने सुचविलेल्या नावांची अध्यक्षपदी निवड झाली होती. ज्येष्ठ कथालेखक भारत सासणे हे विद्यमान संमेलनाध्यक्ष आहेत.

Story img Loader