जन्मत:च फुप्फुसाची झडप नसलेल्या एका नवजात बाळावर पीडीए स्टेंट टाकण्याची दुर्मीळ हृदय शस्त्रक्रिया आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओ थोरॅसिक सायन्सेस (एआयसीटीएस) मध्ये यशस्वी करण्यात आली. या बाळाला असलेल्या विकाराला वैद्यकीय परिभाषेत पल्मनरी एट्रेशिया असे म्हणतात. स्टेंट टाकण्याची प्रक्रिया यशस्वी झाल्यामुळे या बाळाला नवजीवन मिळाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> पुणे : करोना काळात कर्तव्यावर असताना मृत झालेल्यांचे स्मारक

या नवजात बाळाचे वजन अडीच किलो एवढे होते. फुप्फुसाची झडप नसल्यामुळे फुप्फुसाच्या मुख्य धमन्यांकडे जाणारा रक्तप्रवाह ज्या एका लहान नळीद्वारे सुनियोजित राखला जातो ती नळी जन्मानंतर काही वेळात बंद होते. नवजात बालकांमध्ये अवयव नाजूक असल्यामुळे स्टेंट घालणे हे अत्यंत आव्हानात्मक असते. या पार्श्वभूमीवर हृदय रक्तवाहिन्यांच्या शल्यविशारदांनी ग्रीवा रोहिणीमध्ये छेद देऊन रक्तप्रवाह सुरळीत करण्याची प्रक्रिया यशस्वी केली.