पुणे : काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे हे पुण्यात एका कार्यक्रमा करिता आले होते.त्यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत,अनेक घडामोडी बाबत भाष्य देखील केले.आतापर्यंत तुम्ही कामावरती मतदान केल होत,पण यावेळी धर्मावर मतदान केले आहे.याबाबत मला वाईट वाटत असे विधान खासदार प्रणिती शिंदे यांनी केले आहे.त्या प्रश्नावर सुशीलकुमार शिंदे म्हणाले की,ते बरोबर आहे.समाज हा आता जातीवर,धर्मावर विचार करण्याचा प्रयत्न करतोय,त्यावर आता सगळ मतदान होत आहे.हे देशाच्या दृष्टीने आणि सामाजिक समतेच्या दृष्टीने चुकीचे असल्याची भूमिका त्यांनी यावेळी मांडली.
विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले.यामुळे प्रदेश अध्यक्ष पदाच्या बदला बाबत चर्चा सुरू झाल्या आहेत.त्याच दरम्यान नाना पटोले यांनी हायकमांडकडे राजीनामा दिल्याची चर्चा आहे.त्या प्रश्नावर सुशीलकुमार शिंदे म्हणाले की,मला त्याबाबत काही माहिती नाही आणि मी सध्या टचमध्ये नाही.पण हायकमांडच्या मनामध्ये काय आहे.हे काही सांगता येणार नाही.बदल्याच असतील तर ते बदलतील, अशी भूमिका त्यांनी मांडली.