पुणे : ठाकरे गटाच्या प्रवक्त्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आज ट्विट केलं. त्या ट्विटची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू आहे. त्याबाबत पुण्यात एका कार्यक्रमासाठी सुषमा अंधारे आल्या होत्या. त्यावेळी त्यांना त्याबाबत विचारले असता त्या म्हणाल्या की, देवेंद्रजी आणि टीम भाजपा इतरांना कायम तुच्छ लेखत कोणाला तरी किंचित सेना म्हणायचं, कोणाला तरी शिल्लक सेना म्हणायचं, कोणाला तरी पप्पू म्हणायचं आणि सतत एक दर्पोक्ती करित रहायची. त्यामुळे अशी दर्पोक्ती करणारी माणस दुसऱ्यासाठी खड्डा खोदण्यात व्यस्त होतात. तेव्हा नागपूरमध्ये किती मोठा खड्डा खोदला जात आहे. याकडे दुर्लक्ष होतं, त्याच आशयाचे ट्विट होत असल्याचं सांगत भाजपाचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी टीका केली.
हेही वाचा >>> “अजित पवारांवर अनेक वेळा अन्याय पण त्यांना तो…” चंद्रकांत पाटलांचं विधान
तर भाजपाच्या आसुरी सत्ताकांक्षेला रोखता येऊ शकते
आताच्या निवडणुकीत आम्ही आमची जागा राखली चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात त्या प्रश्नावर सुषमा अंधारे म्हणाल्या की, ‘गिरे तो भी नाक पर’ अस म्हणणं काही लोकांना लागु होत असेल हा निकाल अंत्यत ऊर्जादायि आणि सकारात्मक आहे. तसेच हा निकाल एक संदेश देणारा आहे. भाजपाची किती ही आसुरी सत्ताकांक्षा असली आणि महाविकास आघाडीने एकमेकांची साथ देऊन लढायच ठरविले. तर भाजपाच्या आसुरी सत्ताकांक्षेला रोखता येऊ शकते. तसेच कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत हाच ट्रेंड दिसेल अशी भूमिका त्यावर त्यांनी मांडली.