नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी भाजपा नेते किरीट सोमय्यांनी आक्रमक होत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. कोर्लई येथे रश्मी ठाकरे यांचे १९ बंगले होते. मात्र, आता हे बंगले गायब आहेत, याची चौकशी करावी, अशी मागणी सोमय्यांनी केली होती. तसेच याप्रकरणी सोमय्यांनी रेवदंडा पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली. दरम्यान, या आरोपाला उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – प्रताप सरनाईकांच्या घोटाळ्यात उद्धव ठाकरेंची ‘पार्टनरशीप’? आपल्याच सरकारमधील नेत्याचं नाव घेत सोमय्यांचं मोठं विधान

काय म्हणाल्या सुषमा अंधारे?

“किरीट सोमय्या जे काम करतात, ते प्रशंसेस पात्र असतं. फक्त ते आरंभशूर फार आहेत, एवढीच माझी त्यांच्याबद्दल तक्रार आहे. कारण ते चौकशी करतात, पण पुढे त्याचं काहीच होत नाही. राहिला प्रश्न १९ बंगल्याचा जर किरीटभाऊंचा टेस्ट बदलला असेल, ऐरवी ते उद्योगांबाबत बोलतात, आता जर त्यांना बंगल्याची चौकशी करण्याचा मूड झाला असेल, तर मुख्यमंत्र्यांकडे सहा बंगले कसे काय? यावरही त्यांनी बोललं पाहिजे”, असं प्रत्युत्तर सुषमा अंधारे यांनी दिलं. तसेच “सह्यांद्री, नंदनवन, रामटेक, वर्षा आणि शेजारचे दोन-तीन बंगले सुद्धा त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी किती बंगले त्यांच्याकडे ठेवावेत, याची काही नियमावली आहे का? याबद्दल माहिती देऊन किरीटभाऊंनी माझ्या ज्ञानात थोडी भर घालावी”, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.

हेही वाचा – आंध्र प्रदेशात चंद्राबाबू नायडूंच्या कार्यक्रमात पुन्हा चेंगराचेंगरी; तिघांचा मृत्यू, नेमकं कारण आलं समोर

दरम्यान, नाशिक दुर्घटनेवरूनही त्यांनी शिंदे सरकारवर टीका केली. “या घटनेतील पीडितासाठी मुख्यमंत्र्यांनी मदत जाहीर केली, ते ठीक आहे. मात्र, राज्यात ज्या आगीच्या घटना घडत आहे, त्यासाठी लागणाऱ्या आपत्ती व्यवस्थापन मंत्रालयाबाबत हे सरकार गंभीर दिसत नाही. तसेच महिला व बालकल्याण मंत्रालयासाठी स्वतंत्र मंत्री नसने, ही दुर्दैवी बाब आहे”, असेही त्या म्हणाल्या.