ज्या देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्यावर ७० हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला. अजित पवार यांच्यावर वारंवार टीका केली. धरणग्रस्त वक्त्यावर देवेंद्र फडणवीस बोलले. त्याच धरणातील पवित्र तीर्थ डोळ्याला आणि डोक्याला लावून ते पवित्र झाले आहेत. असा सणसणीत टोला शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. त्या पिंपरी- चिंचवड मध्ये बोलत होत्या. देवेंद्र फडणवीस यांची दुकानदारी बंद होण्याची वेळ आली असून प्रचंड कूटनीतीने महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाच्या महत्वकांक्षासाठी भाजप पक्षाची प्रतिष्ठा पणाला लावली यामुळे भाजप अडचणीत आलं आणि भाजपची नकारात्मक छबी महाराष्ट्रात निर्माण झाली. याला देवेंद्र फडणवीस जबाबदार असून त्यांचं दुकान आता इंडियामुळे बंद होईल असा विश्वास सुषमा अंधारे यांनी व्यक्त केला आहे. जो अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्या काळात भाजप होती. त्या भाजपाचं केंद्र सरकारमधील नेत्यांनी आणि देवेंद्र फडणवीस यांनी स्वरूप बदलल असून भाजपा हे आता भाड्याने जमवलेला पक्ष बनला आहे असा टोला देखील त्यांनी लागवलेला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> “निवडणुकांना जेवढा उशीर होईल…”, विशेष अधिवेशनावरून रोहित पवारांचा भाजपावर मोठा आरोप

शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या फायर ब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपावर चौफेर टीका करत देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावले आहेत. पिंपरी- चिंचवडमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी चौफेर फटकेबाजी करत देवेंद्र फडणवीस यांना केंद्रबिंदू मानून त्यांच्यावर टीका केली आहे. सुषमा अंधारे म्हणाल्या, जनतेच्या मनात पंतप्रधान नरेंद्र मोदींच नाव असेल तर हे भाजप नेते निवडणुकांना का घाबरत आहेत?. स्थानिक स्वराज्य निवडणुकांसह सिनेट च्या निवडणूका यांनी थांबवल्या आहेत. जर शंभर पक्ष एकत्र आले तरी पराभव करू शकत नाहीत तर निवडणूका होऊन जाऊद्या दूध का दूध पाणी का पाणी होईल असं त्या म्हणाल्या. पुढे त्या म्हणाल्या, क्रांती ज्योतीबा फुलेंचा अपमान करणाऱ्या भिडेला ज्यांनी अभय दिलय. महात्मा गांधीजींच्या आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल गरळ ओकतो. त्या मनोहर भिडेला अभय दान करणारे हे देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला शहाणपण शिकवू नये. पुढे त्या म्हणाल्या, घोटाळे लपवण्यासाठी बैठका सुरू आहेत असा आरोप देवेंद्र फडणवीस करत आहेत. हे बोलणं देवेंद्र फडणवीस यांना शोभत नाही. ७० हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनीच अजित पवार यांच्यावर केला.

हेही वाचा >>> “मला पवार-शिंदेंबरोबरची भाजपा आवडत नाही”, सुधीर मुनगंटीवार यांचं वक्तव्य चर्चेत; नेमकं काय म्हणाले वाचा!

अजित पवारांच्या धरणग्रस्त वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस बोलले, त्या धरणातील पवित्र तीर्थ डोळ्याला आणि डोक्याला लावून पवित्र झालात तुम्ही. भाजपात ताकद असेल तर भिडा, मर्दा सारखे लढा, निवडणूका घ्या. आ देखे किसमे कितना है दम. अस चॅलेंज त्यांनी भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांना केले आहे. पुढे त्या म्हणाल्या, इंडियाच्या बैठकीचा फिव्हर सुरू झाला असून किटकांसारखे अनेक जण टीका करत आहेत. निलेश राणे आणि नितेश राणे यांना संस्कार नावाचे व्हिटॅमिन कमी पडले आहे. त्यामुळे ते सतत किरकिर करतात. असा टोला राणे भावंडाना लगावला आहे.  त्यांच्याकडे फारस लक्ष देत नाही. अस ही त्या म्हणाल्या. पुढे त्या म्हणाल्या, उद्धव ठाकरे यांच नाव पंतप्रधानाच्या यादीत असेल तर ती आनंदाची गोष्ट असेल. हे सर्व बैठकीच्या नंतर ठरेल. देवेंद्र फडणवीस यांची दुकानदारी बंद होण्याची वेळ निश्चित आलेली आहे. प्रचंड कुटणीतीने महाराष्ट्रात व्यक्तिगत मुख्यमंत्री पदाच्या महत्वकांक्षेसाठी पक्ष आणि पक्षाची प्रतिष्ठा पणाला लावली. भाजपला ही अडचणीत आणलं, भाजपाची नकारात्मक छबी महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे तयार झाली. त्यामुळं त्यांचं दुकान नक्कीच आता टीम इंडिया बंद करेल. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. भाजपचे स्वरूप अटल बिहारी वाजपेयी आणि लाल कृष्ण अडवाणी यांच्या काळात होते ते आता केंद्रसरकार आणि देवेंद्र फडणवीस यांनी बदलले आहे. 

हेही वाचा >>> “जनतेसाठी नाही तर आपली दुकानं बंद होतील ती वाचावीत म्हणून ‘इंडिया’तले पक्ष…”, देवेंद्र फडणवीसांची टीका

भारतीय जनता पक्ष हा भाजपा आता भाड्याने जमवलेला पक्ष झाला बनवला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीतून सर्व नेते आणले आहेत. पुढे ते म्हणाले, महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस यांच्या बद्दल असलेली नकारात्मकता वाढत चाललेली आहे ती बदलणार नाही. ती नकारात्मकता घालवण्यासाठीच अमित शहा यांनी अजित पवार यांचा एन्ट्री चा कार्यक्रम हा केवळ देवेंद्र फडणवीस यांना शह देण्यासाठी होता. त्यामुळे पुन्हा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात दिसणार नाहीत. त्याच कारण म्हणजे स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी दोन पक्ष फोडले. महाराष्ट्रातील राजकारण अस्थिर केलं. शिल्लक सेना म्हणून हिणवणारे गेल्या तीन दिवसापासून अस्वस्थ आहेत. नवनीत राणा म्हणाले की उद्धव ठाकरे यांच्या दम नाही…, त्या बिचारी बाईला मराठी कळत नाही. त्यामुळे उद्धव ठाकरेंमध्ये दम नाही कसं सांगायचं त्यांना हा प्रश्न आहे. हा मराठीतील शब्द आहे नेमकं त्यांना सांगायचं कसं. आम्ही सुसंस्कृत लोक आहोत आमच्यावर चांगले संस्कार आहेत. शिवसेनेमध्ये एवढी पडझड झाल्यानंतर ही सत्तेचा गैरवापर करून ज्याला कोणी संपवू शकत नाही त्या व्यक्तीचं नाव आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे. अस त्या म्हणाल्या आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sushma andhare slams devendra fadnavis over alliance with ajit pawar kjp 91 zws
Show comments