पुणे : विवाहाचे आमिषाने डॉक्टर तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या सांगलीतील एका डॉक्टरला बिबवेवाडी पोलिसांनी नवी मुंबई परिसरातून अटक केली. आरोपी डॉक्टरने तरुणीकडून दहा लाख रुपये उकळून तिची फसवणूक केली होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
याप्रकरणी डॉक्टर कुलदीप आदिनाथ सावंत (वय ३० रा. उमराणी रोड, शंकर कॉलनी, जि. सांगली) याला अटक करण्यात आली. त्याला नवी मुंबई परिसरातून ताब्यात घेण्यात आले होते. याबाबत डाॅक्टर तरुणीच्या वडिलांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. आरोपी सावंत याने एका विवाहविषयक संकेतस्तळावर नोंदणी केली होती. संकेतस्थळावर बिबवेवाडीतील डाॅक्टर तरुणीची आरोपी सावंत याच्याशी ओळख झाली. सावंत विवाहित होता. ही बाब त्याने डाॅक्टर तरुणीपासून लपविली होती. त्यानंतर त्याने डाॅक्टर तरुणीला जाळ्यात ओढून तिच्याकडून वेळोवेळी दहा लाख रुपये घेतले. तरुणीने विवाहाबाबत विचारणा सुरू केल्यानंतर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.
तरुणीने त्याला जाब विचाराला. तेव्हा त्याने विवाहित असल्याचे तिला सांगितले. या घटनेमुळे तिला मानसिक धक्का बसला. त्यानंतर ७ जानेवारी रोजी बिबवेवाडीतील दवाखान्यात डाॅक्टर तरुणीने विषारी ओैषध पिऊन आत्महत्या केली. आत्महत्येस प्रवृत्त करणे, तसेच फसवणूक केल्याप्रकरणी आरोपी डाॅक्टर सावंतविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर तो पसार झाला. बिबवेवाडी पोलिसंकडून त्याचा शोध घेण्यात येत होता. तो नवी मुंबईत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले.
परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक आयुक्त धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर साळुंखे, उपनिरीक्षक शशांक जाधव, सहायक पोलीस फौजदार सोमनाथ सुतार, पोलीस कर्मचारी नीलेश खोमणे, सुमित ताकपेरे, अजय कामठे, विशाल जाधव, ज्योतिष काळे, आशिष गायकवाड, शिवाजी येवले, प्रवीण पाटील यांनी ही कामगिरी केली.