पुणे : विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याविषयी जाणीवपूर्वक संभ्रमाचे वातावरण निर्माण केले जात आहे. अजित पवार हा काम करणारा माणूस आहे, अशी टिप्पणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी बारामतीमध्ये केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्तीची घोषणा आणि त्यानंतर निवृत्तीमागे चार दिवसांच्या राजकीय घडामोडीनंतर शनिवारी बारामतीमध्ये दाखल झालेल्या शरद पवार यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. ‘राजीनाम्याचा विषय संपला असून आता कामाला सुरुवात’, अशी टिप्पणी पवार यांनी केली. पुढे ते म्हणाले,की विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याविषयी जाणीवपूर्वक संभ्रमाचे वातावरण निर्माण केले जात आहे. अजित पवार हा काम करणारा माणूस आहे. गेल्या काही दिवसांतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदासंदर्भातील घडामोडींनंतर शरद पवार यांचे शनिवारी बारामतीमध्ये आगमन झाले.

माळेगाव येथील गोिवदबाग निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावर राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पवार यांचे जंगी स्वागत केले. पवार यांच्या निवृत्तीच्या निर्णयाने बारामतीमध्ये पक्ष पदाधिकाऱ्यांसह नागरिकांमध्येही अस्वस्थता होती. मात्र, शुक्रवारी निवृत्तीचा निर्णय मागे घेतल्याची घोषणा झाल्यानंतर फटाके फोडून बारामतीतील कार्यकर्त्यांनी जल्लोष केला होता. पवार यांचे आगमन होताच कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून आणि पेढे वाटून आनंद व्यक्त केला. पवार येणार असल्याचे समजताच गोिवदबाग येथील त्यांच्या निवासस्थानाच्या प्रवेशद्वाराशी सकाळपासूनच गर्दी झाली होती. पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते आणि उद्योजक रवी काळे यांनी गुलाबांचा पुष्पहार अर्पण करून पवार यांचे स्वागत केले. माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे संचालक योगेश जगताप यांच्यासह विविध पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.