लोकसत्ता प्रतिनिधी
पिंपरी: औद्योगिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. शहराला पायाभूत सुविधांची गरज आहे. शहराचा संतुलित मार्गाने विकास होणे आवश्यक आहे. त्यासाठी शाश्वत विकासाच्या विविध बाबींवर काम करण्याकरिता प्रशासकीय संरचनेत ‘शाश्वत विकास कक्ष’ सुरू करण्यात आल्याचे महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने बुधवारी वाकड येथे शाश्वत विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना सिंह यांनी ही माहिती दिली. यावेळी आमदार उमा खापरे, अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, प्रदीप जांभळे, उल्हास जगताप, शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य लेखा व वित्त अधिकारी जितेंद्र कोळंबे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे आदी उपस्थित होते. शाश्वत विकासाच्या संकेतस्थळाचे आमदार खापरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
हेही वाचा… गरिबांच्या धान्यावर डल्ला.. टोळी गजाआड
रोजगारासाठी नागरिक शहरांमध्ये स्थलांतरित होत आहेत. नागरिकरणाचा वेग प्रचंड वाढत आहे. शाश्वत विकासाच्या विविध बाबींवर काम करण्यासाठी शाश्वत विकास कक्ष सुरू करण्यात आला आहे. त्यासाठी पर्यावरण संवर्धन हवा, पाणी, ध्वनिप्रदूषण, हरितीकरण, जैवविविधता, घनकचरा, आरोग्य, वाहतूक, वातावरण बदल, पर्यावरण पूरक इमारती, नदी पुनरुज्जीवन, जलस्रोत पुनरुज्जीवन आदी घटकांचा विचार करण्यात येणार असल्याचे आयुक्त सिंह यांनी सांगितले.
हेही वाचा… मोठी बातमी! एमपीएससी परीक्षेत राज्यात तिसरी आलेल्या दर्शना पवार खून प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक
महापालिका शाश्वत विकास कक्षाच्या माध्यमातून आदर्श शहराच्या विकासासाठी काम करीत आहे. लोकप्रतिनिधी म्हणून महापालिकेच्या या स्तुत्य उपक्रमासाठी आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल, असे आमदार खापरे म्हणाल्या.