कर्वेनगर मधील सुवर्णरत्न गार्डन सोसायटीने उभारलेल्या ओला कचरा विघटन प्रकल्पाचे उद्घाटन पालक मंत्री गिरिश बापट यांच्या हस्ते करण्यात आले.
‘२०० सदनिका असणाऱ्या सोसायटीने सामाजिक जाणीवेतून हा प्रकल्प उभारला आहे, या प्रकल्पाचे उद्घाटन करताना मला आनंद होत आहे. यासाठी सोसायटीला दहा लाख रुपये खर्च आला असला तरी आपण निर्माण केलेला कचरा आपणच जिरवला पाहिजे ही भावना स्तुत्य आहे. शहरातील अन्य गृहसंकुलांनी ही याचा आदर्श घ्यावा व असे प्रकल्प उभारावेत. कचऱ्यामुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण होण्यापेक्षा असे प्रकल्प उभारणे श्रेयस्कर आहे,’ असे मत बापट यांनी या वेळी व्यक्त केले.
या प्रकल्पामागची भूमिका स्पष्ट करताना सोसायटीच्या अध्यक्ष मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या, की आपल्या दारात कोणी कचरा टाकला तर आपल्याला ते आवडणार नाही, मग आपण दुसरयाच्या दारात आपला पुण्याचा कचरा टाकत आहोत याची आम्हास बोच होती.आम्ही आमचा कचरा स्वत:
जिरविण्यासाठी गांडूळ खत प्रकल्प यासह अनेक प्रयत्न केले,मात्र ते पूर्ण यशस्वी झाले नाहीत,म्हणून आम्ही दहा लाख रुपये खर्च करून हा ओला कचरा विघटन प्रकल्प उभारला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना खा.अनिल शिरोळे यांनी मंजुश्री खर्डेकर यांचे अभिनंदन केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suvarnaratna garden soc