पुण्यातील ‘दादा मी प्रेग्नंट आहे’ या बॅनरचे गूढ उकलले असतानाच आता हडपसरमध्ये ‘जा तू स्वप्नली, मी तुला राहू देणारच नाही’ असे पत्रक ठिकठिकाणी लावण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी ही भित्तीपत्रके काढली असून या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

हडपसर येथे बुधवारी सकाळी भिंतीवर आणि विजेच्या खांबावर पत्रके लावण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या पत्रकांमध्ये एका तरुणीविषयी आक्षेपार्ह मजकूर असल्याने पोलिसांनी ही पत्रके काढून टाकली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आता तपासाला सुरुवात केली आहे. पत्रकावरुन आकाश, स्वप्नली आणि शैलेश या तीन नावांचा उल्लेख असून प्रेमभंगातून ही पत्रकबाजी करण्यात आल्याचे दिसते.

काय म्हटलंय पत्रकात ?

‘स्वप्नली आणि मी कॉलेजमध्ये असल्यापासून रिलेशनशिपमध्ये होतो. घरच्यांच्याविरोधात जाऊन आम्ही लग्न देखील केले. पण ती मला काही महिन्यांपूर्वी सोडून गेली. तिचं माझ्या आईशी पटत नव्हते. तिला माझ्या घरच्यांसोबत राहायचे नव्हते. आता ती शैलेश नामक तरुणाशी लग्न करत आहे. ती पैशांसाठी त्याच्याशी लग्न करत असून नवरा- बायकोचं नाते सोडून कोणी जातं का?. जी मला सोडून जातेय ती दुसऱ्याची काय होणार? तू कुठेही जा स्वप्नली मी तुला राहूच देणार नाही’, असे या पत्रकात म्हटले आहे.

 

Story img Loader