महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्यानं नैराश्यात गेलेल्या स्वप्निल लोणकर या तरुणाने आत्महत्या केली. पुण्यात त्याने गळफास घेतला. आत्महत्या करण्यापूर्वी रोहितने एक पत्र लिहिलं होतं, ज्यात परीक्षा पास होऊनही नोकरी मिळत नसल्यानं होत असलेल्या वेदनांना वाट मोकळी करून दिली. इतकं टोकाचं पाऊल का टाकावं लागलं… याची व्यथा मांडत स्वप्निल गळ्याला फास लावून घेतला… अखेरच्या काही तासांत त्याच्या मनात काय सुरू होतं… याची उत्तरं त्याने पत्रातून दिली आहेत…

हा माझा तळतळाट… एखाद्या मंत्र्याच्या मुलाने आत्महत्या करावी; स्वप्निलच्या आईचा आक्रोश

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गर्दीत हरवलेल्या आणि नोकरीची वाट बघत शेवटी फास लावून घेणाऱ्या स्वप्निलच्या मृत्यूनंतर त्यांच्या आईचा आक्रोश काळजी पिळवटून टाकत आहे. ऐन उमेदीच्या काळात खचून गेल्यानं स्वप्निलनं टोकाचं पाऊल उचललं, पण निर्णयाने त्याच्या आईच्या काळजावर मोठा घावच घातला. मागच्या दोन वर्षांपासून स्वप्निलच्या मनावर होत असलेल्या आघातांचे अनुभव सांगत त्या माऊलीने सरकारला जळजळीत सवाल केला आहे. ‘मला माहितीये माझं पोरंग किती झुरायचं… दोन वर्ष माझं पोरंग किती झुरलं. आई, इंटरव्ह्यू झाला नाही, असं म्हणायचं. मी पास झालो, इंटरव्ह्यू नाही झाला,’ असं म्हणत स्वप्निलच्या आईने हंबरडा फोडला. (संपूर्ण बातमी वाचण्यासाठी आणि व्हिडीओ बघण्यासाठी क्लिक करा)