महामेट्रोचे काम पुण्यात वेगाने सुरू असून गेल्या वर्षभरात वीस टक्के काम पूर्ण करण्यात आले आहे. दुसऱ्या टप्प्यातील स्वारगेट ते कात्रज आणि पिंपरी ते निगडी दरम्यानच्या मार्गाचा प्रकल्प विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. मात्र, स्वारगेट ते कात्रज दरम्यानच्या दुसऱ्या टप्प्यातील मेट्रो मार्गासाठी उड्डाण पुलांचा अडथळा येत आहे. त्यासाठी पर्याय शोधून तो मार्ग तयार करण्याचा प्रयत्न महामेट्रोकडून केला जाणार आहे.

महामेट्रोचे काम पुणे व पिंपरीत सुरू असून त्या पाश्र्वभूमीवर नागपूर मेट्रोचे काम साठ टक्के पूर्ण झाले आहे. त्याची पाहणी करण्यासाठी महामेट्रोकडून प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसाठी नागपूर दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी या वेळी मेट्रोच्या विविध कामांची माहिती दिली. नागपूर मेट्रोच्या कामाला १ मे २०१५ रोजी सुरुवात झाली. मिहान ते खापरी दरम्यान साडेपाच किलोमीटरच्या मार्गावर मेट्रो रेल्वेची चाचणी घेण्यात आली आहे. दिल्ली मेट्रो रेल्वेकडून सुरक्षाविषयक अहवाल आल्यानंतर पहिल्या साडेपाच किलोमीटर दरम्यान नागपूर मेट्रो रोज धावणार आहे. मेट्रोचे सर्व काम पूर्ण होईपर्यंत त्या मार्गावरील मेट्रो रेल्वेचा वेग कमी ठेवण्यात येणार आहे. उर्वरित काम एक वर्षांत पूर्ण होऊन पुढील वर्षी नागपूर मेट्रो प्रवाशांच्या सेवेसाठी खुली करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. नागपूर मेट्रोप्रमाणेच पुणे महामेट्रोचे कामही वेगाने सुरू आहे. पिंपरी ते रेंजहिल दरम्यान मेट्रोसाठी आवश्यक बहुतांशी जागा मेट्रोच्या ताब्यात आहेत. संरक्षण विभागाच्या हद्दीतील जागाही लवकरच ताब्यात येईल. पुणे मेट्रोची चाचणीही पुढील वर्षांच्या मध्यापर्यंत घेण्याचा प्रयत्न आहे. पुणे मेट्रोचे सध्या वीस टक्के काम पूर्ण झाले आहे, असे डॉ. दीक्षित यांनी सांगितले.

6 feet long snake entered the MIDC police station
पोलीस ठाण्यात साप आणि पोलिसांची तारांबळ
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त
Chief Minister of Telangana, Himachal and Deputy Chief Minister of Karnataka reply to BJP on the scheme Print politics
गरिबांचे पैसे गरिबांना ही काँग्रेसची हमी; तेलंगणा, हिमाचलचे मुख्यमंत्री तर कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांचे भाजपला प्रत्युत्तर
vip roads for ordinary pune residents
लोकजागर : सामान्य पुणेकरांना ‘व्हीआयपी’ रस्ते मिळतील का?
pune police arrested three for stealing mobile phones
मोबाइल चोरणाऱ्या सराइतांना अटक; १२ मोबाइल संच जप्त; ९ गुन्हे उघड
Air Quality Index, air pollution, Uran city, raigad district
हवा प्रदूषणात उरण देशात तिसऱ्या क्रमांकावर, शहरातील नागरिकांना सर्दीखोकला तसेच श्वसनाचा त्रास
pune municipal corporation create email address for complaints regarding water issues
समाविष्ट गावातील पाणीपुरवठ्याच्या तक्रारींसाठी पालिकेने घेतला हा निर्णय !

मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे काम प्रगतिपथावर असतानाच पुणेकरांच्या आग्रहास्तव दुसऱ्या टप्प्यात स्वारगेट ते कात्रज आणि पिंपरी ते निगडीपर्यंतच्या वाढीव मार्गाच्या कामाचा प्रकल्प विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. प्रकल्प विकास आराखडा तयार करताना स्वारगेट ते कात्रज या मेट्रो मार्गावर स्वारगेट येथील उड्डाणपुलाचा अडथळा येत आहे. त्यामुळे त्यातून मार्ग काढण्यासाठी पर्याय शोधण्यात येत आहे.

मेट्रोनामा

  • स्वारगेट ते कात्रज दरम्यानच्या दुसऱ्या टप्प्यातील मेट्रो मार्गाला उड्डाण पुलांचा अडथळा
  • मेट्रो मार्गाचे काम करण्यासाठी भुयारी मार्ग किंवा उड्डाण पुलाला समांतर मेट्रो मार्ग करण्याचा पर्याय
  • पहिल्या वर्षांत मेट्रोचे वीस टक्के काम पूर्ण
  • या वर्षी मेट्रोच्या कामाचा वेग वाढणार